Radhakrishna Vikhe Patil : ...अन्यथा दूध संघ, संस्थांचे परवाने रद्द करावे लागतील; दुग्धविकासमंत्री चिडले

Milk Production in Maharashtra : दूध भेसळ बंद झाल्यास दर वाढण्यास मदत होणार
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe PatilSarkarnama
Published on
Updated on

विशाल वामनराव पाटील

Satara News : दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अहमदनगर जिल्ह्यात गेल्या सहा दिवसांपासून दुधाला 34 रुपये दर मिळावा, यासाठी आंदोलन सुरू आहे. या प्रश्नाबाबत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनीही ट्विट करत सरकारला लक्ष घालण्याची विनंती केली आहे.

या प्रश्नावर आता दुग्धविकासमंत्र्यांनी दुधाला 34 रुपये दर न दिल्यास काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. दूधसंघ, प्रसंगी खासगी दूध संस्था ऐकणार नसतील तर शेवटी त्यांचे परवाने रद्द करावे लागतील, असा इशारा दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी दिला आहे.

दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितीत दुधाला 34 रुपये भाव दूध कंपन्या आणि दूध संघांनी द्यावा, असा आदेश काढला होता. असे असतानाही या आदेशाचे पालन केले जात नसून दूध उत्पादक शेतकऱ्यांना 26-27 रुपये दर मिळत आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती आणि किसान सभेच्या नेतृत्वाखाली गेल्या सहा दिवसांपासून उपोषण सुरू आहे. यावर मंत्री विखे पाटील चांगलेच चिडल्याचे दिसून आले. 

Radhakrishna Vikhe Patil
Laxman Mane : मराठा आरक्षणाबाबत लक्ष्मण मानेंचे मोठे विधान; म्हणाले, 'केंद्राने मर्यादा...'

दूधदराबबात मंत्री विखे म्हणाले, आम्ही कमीत-कमी 34 रुपये दर देण्याबाबत आदेश दिला होता. काही दूध संस्था, खासगी दूध संघ आदेश पाळत नाहीत, अशी तक्रार आहे. गेल्या आठवड्यात सर्व खासगी संस्थांची बैठक बोलावली, उपोषणकर्ते डॉ. अजित नवले यांनाही बोलावले होते. रयत क्रांतीचे सदाभाऊ खोत यांनी दुधाला दराबाबत मागणी केली होती, त्यामुळे तेही बैठकीला उपस्थित होते. यामधून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहोत.

Document
DocumentSarkarnama

भेसळ रोखल्यास दूधदर वाढणार

बटर आणि भुकटीचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात कोसळल्यामुळे भाव देता येत नाही, असे सांगितले जाते. मात्र, वस्तुस्थिती काही वेगळीच आहे. महाराष्ट्रात 30 टक्क्यांहून अधिक दुधात भेसळ आहे.

आपण भेसळ रोखू शकल्यास दुधाची मागणी आणि पुरवठा यांच्यामधील गॅप कमी होईल. परिणामी दुधाचा भाव वाढू शकतो. मी उपोषणकर्त्यांना आश्वासित करतो, वित्तमंत्री यांच्यासोबत पुढील दोन-तीन दिवसांत बैठक घेता येईल.

तसेच काही कठोर निर्णय केले पाहिजेत प्रसंगी दूध संघ ऐकणार नसतील, खासगी दूध संस्था ऐकणार नसतील, तर शेवटी त्यांचे परवाने रद्द करावे लागतील, असा इशारा दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishn VIkhe) यांनी दिला.

Radhakrishna Vikhe Patil
Vijay Auti Parner : विजय औटींनी उपस्थित केला कळीचा मुद्दा; अतिवृष्टीवरून सरकारची कोंडी

शरद पवारांचे ट्विट

गेल्या काही दिवसांपासून दुधाच्या दराच्या प्रश्नांवर डॉ. अजित नवले व इतर कार्यकर्त्यांची बेमुदत उपोषण सुरू आहे. यावर शरद पवार (Sharad Pawar) यांनी ट्विट करून सरकारचे कान टोचले. महाराष्ट्र शासनाने दिनांक १४ जुलै २०२३ रोजी अध्यादेश काढून गाईच्या दुधाला किमान ३४ रुपये प्रतिलिटर निश्चित करूनही या आदेशाचे पालन दूध संघांकडून होत नाही असे दिसते. यासंदर्भात शासनाने तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे. त्यासाठी दूध संघानेही सहकार्य करावे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उपोषणकर्ते शेतकरी नेते डॉ. नवले व त्यांच्या सहकाऱ्यांना आवाहन की त्यांनी प्रकृतीची काळजी घ्यावी, उपोषण मागे घ्यावे. शासनाबरोबर चर्चेतून आपण मार्ग काढू. दूध उत्पादक शेतकरी बांधवांनाही दुधासारखा नाशवंत माल रस्त्यावर ओतून आणखी नुकसान करून घेऊ नये. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नाकडे कृपया लक्ष देऊन तातडीने दूध दरवाढीचे अंमलबजावणी करून घ्यावी, असे आवाहन शरद पवारांनी केले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Radhakrishna Vikhe Patil
Asaduddin Owaisi : ओवैसींचा अन्य राज्यांतील जनाधार संपुष्टात येतोय

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com