Ahmednagar Lok Sabha Constituency : ''मराठीमध्ये कळत नसलं तर इंग्रजीत सांगू का?'' हा डायलाॅग चित्रपटातील वाटत असेल, मात्र हा डायलाॅग चित्रपटातील नाही तर नगरच्या राजकारणातील आहे. फक्त इंग्रजीमध्ये बोलून दाखवा, असे आव्हान देणाऱ्या सुजय विखेंना नीलेश लंकेनी (Nilesh Lanke) हा डायलाॅग मारला आहे. तो पण आपल्या ट्विटरवरून.
सुजयजी, तुम्हाला जनसामान्यांच्या मराठी भाषेत कळत नसल्याचे समजले. तुमच्या सोयीसाठी इंग्रजीत एक संदेश पाठवत आहे. Hard work beats money and muscle. असे ट्विट नीलेश लंके यांनी केले आहे.
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये सुजय विखे (Sujay Vikhe) विरुद्ध नीलेश लंके लढत होत आहे. सुजय विखे यांनी आपल्या जाहीर भाषणात ते उमेदवारी अर्ज मागे घेतील, मात्र त्यासाठी त्यांनी नीलेश लंकेंच्या समोर एक अट ठेवली. नीलेश लंकेंनी माझ्यासारखे इंग्रजी बोलावे. हवे तर महिनाभर पाठांतर करावे. जर ते इंग्रजीत फाडफाड बोलले तर मी उमेदवारी अर्ज भरणार नाही, असे चॅलेंज भरसभेत सुजय विखेंनी लंकेंना दिले.
नीलेश लंकेंनीदेखील सुजय विखेंना चोख प्रत्युत्तर दिले. विखेंना पैशाची मस्त आली आहे. ते गरिबांची टिंगल करत आहेत. माझा जन्म शेतकरी कुटुंबात झाला, त्यामुळे इंग्लिश मीडियम शाळेत मला शिकता आले नाही, पण लोकांचे प्रश्न लोकसभेत (Loksabha) मी नीट मांडू शकतो, असे लंकेंनी ठणकावून सांगत पाच वर्षांत तुम्ही काय काम केलं त्यावर बोला असे प्रतिआव्हान दिले.
लंकेंनी विखेंना उत्तर देताना ट्विटदेखील केले. या ट्विटमध्ये सुजय विखेंना मराठी कळत नसल्याचा टोमणादेखील मारला आहे. त्यासाठी इंग्रजीत मेसेज करत असल्याचे म्हटले. आणि Hard work beats money and muscle केला आहे. त्यामुळे नगरची निवडणूक गरीब विरुद्ध श्रीमंत अशी असल्याचा संदेश लंके यांनी दिला आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.