Abu Azmi News: 'अबू आझमी परत जा'; गुहामध्ये शेकडो तरुण रस्त्यावर...

Rahuri News: अबू आझमी मुंबई येथून संगमनेरमध्ये दाखल झाले आहेत.
Abu Azmi
Abu AzmiSarkarnama
Published on
Updated on

Nagar: राहुरी तालुक्यातील गुहा येथील धार्मिक स्थळावर दोन गटात झालेल्या हाणामारीच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी भेट द्यायला येण्याची माहिती कळताच शेकडो ग्रामस्थ आणि तरुण आक्रमक झाले. शेकडो तरुण रस्त्यावर उतरले असून, अबू आझमी परत जा, असे फलक झळकवले. शेकडो तरुण रस्त्यावर आल्याने गुहा येथील परिस्थिती तणावपूर्ण होती.

गुहा येथील धार्मिकस्थळावर काही दिवसापूर्वी दोन गटात हाणामारी झाली होती. धार्मिक स्थळी झालेल्या या वादाचा पडसाद आता उमटू लागले आहेत. या धार्मिक स्थळाला समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी भेट देण्यासाठी आज नगरमध्ये दाखल झाले आहेत. अबू आझमी मुंबई येथून संगमनेरमध्ये दाखल झाले आहेत. तत्पूर्वी अबू आझमी वाद झालेल्या धार्मिक स्थळाला भेट देण्यासाठी येत असल्याची माहिती समजताच मनमाड महामार्गालगत असलेल्या गुन्हा वेशीजवळ शेकडो ग्रामस्थ आणि तरुण रस्त्यावर उतरले. त्यांच्या दौर्‍याला या तरुणांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. अबू आझमी यांना गावात प्रवेश करून देणार नाही, अशी भूमिका तरुणांनी घेतल्याने काहीसा तणाव निर्माण झाला आहे. तरुणांच्या आक्रमक भूमिकेमुळे पोलिसांनी गावात बंदोबस्त वाढवला आहे. काही तरुणांनी "अबू आझमी परत जा," असे फलक झळकवलेत.

शांतता राखण्याचे आवाहन

गुहा येथे शेकडोच्या संख्येने जमा झालेल्या तरुणांना आवरण्यासाठी मोठा बंदोबस्त होता. त्यावेळी पोलिसांनी काही संशयास्पद तरुणांना ताब्यात घेतले. त्यावेळी तरुणांचा जमाव पोलिसांविरोधात आक्रमक झाला. नशा करून जमावात शिरलेल्या काही तरुणांना पोलीस व्हॅनमध्ये बसवले जात होते. यावेळी तरुणांचा जमाव पोलिसांच्या दिशेने चालून गेला. तरुणांच्या जमावाची आक्रमकता पाहून पोलिसांनी नरमाईची भूमिका घेतली. तसेच काही प्रमुखांनी या तरुणांना शांतता राखण्याचे आवाहन केले. शांततेत जमाव बसून राहणार असले, तर आमची देखील सहकार्याची भूमिका आहे, असे पोलिसांनी सांगितले.

Abu Azmi
Maratha Reservation News : जरांगे भुजबळांवर एकेरी भाषेत टीका करतात, तेव्हा संभाजीराजे गप्प का ?

132 जणांविरुद्ध गुन्हे दाखल..

अबू आझमी हे संगमनेरमध्ये दाखल झाले आहेत. गुहा येथील तणावाच्या पार्श्वभूमीवर राहुरी आणि संगमनेर पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलिसांनी त्यांची भेट घेतली. गावातील धार्मिक स्थळी काही दिवसापूर्वी झालेल्या दोन गटातील हाणामारी प्रकरणी केलेल्या कारवाईची माहिती दिली आहे. या प्रकरणी दोन्ही बाजूने परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहे. तब्बल 132 जणांविरुद्ध गुन्हे दाखल आहेत. पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई सुरू असल्याची माहिती अबू आजमी यांना स्थानिक पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, अबू आजमी हे गुहा येथे येत असल्याच्या पार्श्वभूमीवर नगर पोलिसांनी पुन्हा संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com