Raj-Uddhav Thackeray Vijayi Rally : दोन भाऊ एकत्र आल्याने सुप्रिया सुळेंचा आनंद गगनात मावेना, मुश्रीफ बोलताच आबिटकरांनाही हसू आवरेना...

Hasan mushrif And Prakash Abitkar On Supriya Sule : राज्य सरकारच्या हिंदी सक्तीचा डाव उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी उधळवून लावल्यानंतर आज विजय मेळाव्या झाला. यावरून आता टीका होताना दिसत आहे. अशीच टीका अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांनी केलीय.
thackeray vijayi rally Prakash Abitkar And Hasan mushrif
thackeray vijayi rally Prakash Abitkar And Hasan mushrifsarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा मुंबईत झाला. या मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या. त्यावरून आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून खोचक टीका होताना दिसत आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी यावरून सुळे यांना टोला लगावला असून त्या फार आनंदून गेल्या होत्या. त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. दोन भावांना एकत्रित आणण्यासाठी त्या इतक्या आनंदित होत्या. त्यामुळे दोन राष्ट्रवादीचे काय होईल याचा अंदाज तुम्हीच बांधा! अशा शब्दात मुश्रीफ यांनी टोला लगावला आहे. ते छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयाच्या आरोग्य संकुलाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या प्रसंगी कोल्हापुरात बोलत होते. दरम्यान मुश्रीफ यांच्या या प्रतिक्रियेनंतर आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी याला हसून दाद दिली आहे. ज्याची आता जिल्ह्यात चर्चा सुरू झालीय.

ज्यासाठी मेळावा झाला तो संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला. ज्यासाठी ते एकत्र आले त्यासाठी सर्वांच्या शुभेच्छा आहेत. त्यांनी जे काही ठरवले असेल पण जनता ठरवणार की मैदान कोण मारणार. हे मैदान महायुती योग्य वेळी मारेल, असा विश्वासही मुश्रीफ यांनी व्यक्त केला. तसेच जनताच आणि निवडणुकीचा निकालच ठरवेल की कुणाची ताकद वाढली असेही त्यांनी स्पष्ट केले.

शक्तिपीठ महामार्गावरून बोलताना, आम्हाला आणि शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच हा रस्ता करावा. माझी आणि प्रकाश आबिटकर यांची हीच भूमिका आहे. हा महामार्ग कोणावर लादणार नाही अशी भूमिका मुख्यमंत्र्यांची आहे. सर्वांच्या समन्वयाने मार्ग काढतील, असा आम्हाला विश्वास असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

thackeray vijayi rally Prakash Abitkar And Hasan mushrif
Raj-Uddhav Thackeray Alliance : सडकछाप गुंडा, राज ठाकरे के बाप का महाराष्ट्र हैं क्या ? विजयी मेळाव्याच्या आधीच भाजपच्या नेत्याची जहरी टीका

बात का बतगंड केला....

दोन्ही ठाकरे एकत्र आले आहेत त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. अशा गोष्टी राजकीय दृष्ट्या होतच असतात. अलीकडच्या काळात दर पाच वर्षाला दोन दोन आघाड्या होत आहेत. आता राजकीय दृष्ट्या त्यांनी घेतलेली भूमिका त्यांच्यासाठी योग्य आहे.

thackeray vijayi rally Prakash Abitkar And Hasan mushrif
Raj- Uddhav Thackeray Alliance: विजयी मेळाव्यात ठाकरे बंधू एकत्र, पहिलं भाषण राज ठाकरे करणार!

सत्तेच्या केंद्रबिंदूवर बोलल्याशिवाय त्यांना पुढे जाता येणार नाही. त्यामुळेच दोन्ही ठाकरेंकडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर टीका आणि त्यांना दोष दिल्याशिवाय त्यांना पुढे कसे जाता येईल, मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर टीका करण्याशिवाय विरोधकांना आता कोणतेही काम नसल्याची टीका आबिटकर यांनी केली. जय गुजरातची घोषणा देण्यामध्ये दुसरा कोणताही हेतू नव्हता 'बात का बतंगड' केला जातोय, असेही आबिटकर म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com