राजन पाटलांचं अखेर ठरलं : दोन तारखेला भाजपत प्रवेश, बाळराजेंना विधान परिषदेचा शब्द!

विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील यांनी जनता दरबाराच्या माध्यमातून राजन पाटील व त्यांच्या सुपुत्रांच्या कार्यशैलीचे वाभाडे काढण्याचा एकमेव कार्यक्रम हाती घेतला आहे.
Rajan patil
Rajan patilsarkarnama
Published on
Updated on

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) घुसमट होत असलेले मोहोळचे माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) यांचा भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश अखेर ठरला आहे. येत्या दोन ऑगस्ट रोजी राजन पाटील आपल्या संपूर्ण गटासह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे विक्रांत ऊर्फ बाळराजे पाटील यांना विधान परिषदेवर (MLA) घेण्याचा शब्द भाजपकडून देण्यात आल्याची माहिती आहे. (Rajan Patil and family will join BJP on August 2)

दरम्यान, भाजप प्रवेशाची अफवा असून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत कायम राहू, असे मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजन पाटील यांनी सरकारनामाशी बोलताना सांगितले.

Rajan patil
मोठी बातमी : राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पुण्याचे देवेंद्र फडणवीस होणार पालकमंत्री!

गेल्या काही दिवसांपासून माजी आमदार राजन पाटील हे राष्ट्रवादीत नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. विशेषतः अजिंक्यराणा आणि बाळराजे पाटील यांच्या मनात पक्षाबाबत साशंकता निर्माण झालेली आहे. विरोधात बोलणाऱ्या पक्षातील लोकांना वरिष्ठ नेत्यांकडून बळ दिले जात असल्याचा आरोप पाटील गटाकडून वारंवार केला जात आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील यांनी जनता दरबाराच्या माध्यमातून राजन पाटील व त्यांच्या सुपुत्रांच्या कार्यशैलीचे वाभाडे काढण्याचा एकमेव कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यामुळे उमेश पाटलांचा जनता दरबार राजन पाटलांना जाचक ठरू लागला आहे. उमेश पाटील यांच्याकडून होणाऱ्या हल्ल्याबाबत पक्षनेतृत्वाला सांगूनही ते सुरू राहिल्याने पाटील कुटुंबीय राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर कमालीचे दुखावले आहे.

Rajan patil
सभापतीची बायको, मुलगी ढसाढसा रडायच्या; पण त्यांना न्याय देऊ शकलो नाही : आढळराव

माजी आमदार राजन पाटील यांच्यासारख्या एकनिष्ठ असणाऱ्या नेत्याची कोंडी झाली, या सर्व गोष्टी वरिष्ठांपर्यंत पोचल्या आहेत, परंतु त्यांनी बघ्याची भूमिका घेतली. वरिष्ठांनी बघ्याची भूमिका घेणे म्हणजे अप्रत्यक्ष उमेश पाटील यांना बळ देण्याची भूमिका असल्याची चर्चा आहे. त्यातूनच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विक्रांत ऊर्फ बाळराजे पाटील यांनी गेल्या साधारण पंधरा दिवसांपूर्वी समाज माध्यमावर पोस्ट करीत भाजप प्रवेशाचे संकेत दिले असल्याची चर्चा तालुक्यात आहे.

Rajan patil
राष्ट्रवादीला लवकरच मोठा धक्का?; नाराज राजन पाटलांसाठी फडणवीसांनी फिल्डिंग लावली!

दरम्यान, राजन पाटील आणि कुटुंबीयांचा भाजप प्रवेश आता नक्कीच झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विशेष म्हणजे बाळराजे पाटील यांना विधान परिषदेवर घेण्याचा शब्दही भाजपकडून दिल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादीला गेली तीन पंचवार्षिक आमदार देणारे पाटील कुटुंबीय हे येत्या दोन ऑगस्ट रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे नक्की झाले आहे.

Rajan patil
एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; ठाकरेंना धक्का देत सेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी केली जाहीर

राजन पाटलांच्या हालचालींवर फडणवीसांचे बारीक लक्ष

दरम्यान, मोहोळमधील राजन पाटील यांच्या घडामोडींकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बारीक लक्ष आहे. तालुक्यातील सर्व घटनांची माहिती त्यांनी भाजपचे नेते संजय क्षीरसागर यांच्याकडून घेतली आहे. त्याचवेळी क्षीरसागर यांना त्यांनी यासंदर्भातच आज मुंबईला पाचारण केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे येत्या काळात मोहोळमध्ये राष्ट्रवादीला धक्का बसल्यास नवल वाटायला नको.

आम्ही सत्तेच्या पाठीमागे पळणारे नाहीत : राजन पाटील

सत्ता येत असते, जात असते, पण आम्ही सत्तेसाठी हपापलेलो नाहीत. आम्ही एका विचाराने प्रेरित झालो आहोत. त्यामुळे सत्तेच्या बाजूने आम्ही जाणारे लोक नाहीत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत आम्ही कायम राहू. आम्ही भाजपमध्ये प्रवेश करणार ही अफवा आहे. तशी वेळ आल्यास आम्ही निश्चितपणे मतदारांना सांगू. सध्या माध्यमांमधून भाजप प्रवेशाच्या बाबतीत केवळ अफवा पसरवल्या जात आहेत, असे माजी आमदार राजन पाटील यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com