एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; ठाकरेंना धक्का देत सेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी केली जाहीर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मोठा धक्का दिला आहे.
Uddhav Thackeray, Eknath Shinde
Uddhav Thackeray, Eknath Shinde Sarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मोठा धक्का दिला आहे. आज शिंदे गटाच्या आमदारांची बैठक झाली. त्या बैठकीला शिवसेनेचे (shivsena) १४ खासदार ऑनलाईन उपस्थित होते अशी माहिती मिळत आहे. या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांची मुख्यनेतेपदी नियुक्ती केली आहे. मात्र, त्यांनी पक्षप्रमुख पदाला हात लावला नाही.

आजच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांची पक्षाची राष्ट्रीय कार्यकारीनीही जाहीर केली. त्यामध्ये रामदास कदम (Ramdas Kadam) आणि माजी खासदार आनंदराव आडसूळ (Anandrao Aadsul) यांची नेते पदी नियुक्ती केली. तर आमदार दीपक केसरकर यांची मुख्य प्रवक्तेपदी निवड केली आहे. तर उपनेतेपदी यशवंत जाधव, गुलाबराव पाटील, उदय सामंत, शरद पोंक्षे, तानाजी सावंत, विजय नहाटा, शिवाजीराव आढळराव पाटील यांची निवड केली आहे. त्यामुळे शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला आहे. जुनी शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारणी बरखास्त केली.

Uddhav Thackeray, Eknath Shinde
president election : शिंदे गटाला धक्का ; एक आमदार मतदानास अपात्र

शिंदे यांनी ४० आमदारांना सोबत घेत बंड केले. त्यानंतर त्यांना खासदार आणि माजी आमदार तसेच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचाही पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे शिंदे यांनी थेट आज ठाकरेंना बाजूला ठेवत कार्यकारीनीच जाहीर केली आहे. या बैठकीला शिरुरचे माजी खासदार शिवाजीराव अढळराव पाटील उपस्थित होते.

Uddhav Thackeray, Eknath Shinde
शिवसेनेच्या खासदारांपुढे तीनच पर्याय; संसदेच्या पावसाळी अधिवेशनातच ठरणार रणनीती?

शिंदे यांच्या बैठकीनंतर आमदार योगेश कदम म्हणाले, खासदारांबदल काय निर्णय झाला याबदल एकनाथ शिंदे बोलतील. मी भाष्य करणार नाही. आमच्या बदल अफवा पसरवन्यात आली आहे, पण मुळात आम्हीच राजीनामा दिला आहे. चुकीच्या पद्धतीने विधाने केली जात आहेत. आम्ही अजूनही शिवसैनिक आहोत. रामदास भाई हे सुधा शिवसेनेत आहेत, असेही कदम म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com