Rajnath Singh Maharashtra Daura: संरक्षणमंत्री राजनाथसिंह आज महाराष्ट्र दौऱ्यावर; काय आहे कारण ?

Shirdi, Pravaranagar News: शिर्डी, प्रवरानगर आणि मुंबईला देणार राजनाथसिंह भेट
Rajnath Singh
Rajnath SinghSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar Political News : देशाचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह आज महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. ते अहमदनगर येथील शिर्डी, प्रवरानगर येथील क्रार्यमक्रमांना हजेरी लावून मुंबईला जाणार आहेत. या दौऱ्यामुळे शिर्डी, प्रवरानगर येथे पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. येथे राजनाथसिंह काय बोलणार, याकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. (Latest Political News)

पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या १२३ व्या जयंती सोहळा आणि यानिमित्त दरवर्षी दिला जाणारा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. या कार्यक्रमात राजनाथसिंह उपस्थित राहणार आहेत. तत्पूर्वी ते शिर्डी येथे साईबाबा समाधी मंदिरात दर्शन घेतील. त्यांच्यासमवेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित असल्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि खासदार सुजय विखेंनी दिली.

Rajnath Singh
Local Body Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा निर्णय पुन्हा लांबणीवर; न्यायालयात नेमकं काय झालं?

देशाचे संरक्षणमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री आणि इतर अनेक अतिमहत्वाच्या व्यक्ती साई दर्शन आणि प्रवरानगरमध्ये साहित्य पुरस्कार सोहळ्यास येणार असल्याने परिसरात जिल्हा पोलीस प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था चोख ठेवली आहे. सरंक्षणमंत्री राजनाथसिंह आणि मुख्यमंत्री शिंदे यांचे काकडी विमानतळावर सकाळी ११ वाजता आगमन होणार आहे. त्यांचे स्वागत आणि साहित्य सोहळ्यानिमित्त शिर्डी, लोणी-प्रवरानगर सजले आहे.

Rajnath Singh
Bachchu Kadu Vs Sachin Tendulkar : सचिनच्या घराबाहेर बच्चू कडूंची 'बॅटिंग'; कार्यकर्त्यांसह आंदोलन, पोलिसांनी घेतले ताब्यात !

काकडी विमानतळावरून मंत्र्यांचा ताफा सुरुवातीला साईबाबा मंदिराकडे जाणार आहे. दुपारी राजनाथसिंह साई समाधी मंदिरात दर्शन घेतील. त्यानंतर पालकमंत्री विखे यांच्या लोणी येथील निवासस्थानी मंत्र्यांचा ताफा जाणार आहे. जेवणानंतर दुपारी २ वाजता प्रवरानगर येथील साहित्य पुरस्कार सोहळ्यास ते उपस्थित राहतील.

साहित्य पुरस्काराचे वितरण राजनाथसिंह यांच्या हस्ते पार पडणार आहे. अमळनेर येथे होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष रवींद्र शोभने यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य पुरस्कार सोहळा होणार आहे. कार्यक्रमानंतर विमानाने राजनाथसिंह, मुख्यमंत्री शिंदे मुंबईकडे रवाना जाणार आहेत.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com