Local Body Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा निर्णय पुन्हा लांबणीवर; न्यायालयात नेमकं काय झालं?

Supreme Court On OBC Reservation : सुनावणी पुढे ढकलल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर
Supreme Court
Supreme CourtSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : ओबीसी आरक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायलयात १ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार होती. मात्र न्यायालयाच्या कामकाजात या प्रकरणाचा सामावेश करण्यात आला नाही. परिणामी वर्षभरापासून रखडलेली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरील सुनावणी पुन्हा पुढे ढकलल्याचे स्पष्ट झाले आहे. आता ही सुनावणी २२ सप्टेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या प्रकरणी होणारी सुनावणीला तारीख-पे तारीख अशी स्थिती झाल्याने राज्यातील राज्यातील १५ महानगरपालिका, ९२ नगरपालिकांचे भवितव्य टांगणीला लागण्याचे बोलले जात आहे. (Latest Political News)

ओबीसी आरक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक ही दोन्ही प्रकरणे उच्च न्यायालयात आहे. याबाबत ऑगस्ट २०२२ मध्ये शेवटची सुनावणी झालेली होती. यानंतर उद्या १ सप्टेंबर रोजी सुनावणी होण्याची शक्यता होती. मात्र या प्रकरणी न्यायालयाच्या कामकाजात या प्रकरणाचा सामावेश करण्यात आला नाही. परिणामी वर्षभरापासून रखडलेली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरील सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. परिणामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही लांबणीवर गेल्या आहेत.

Supreme Court
Bachchu Kadu Vs Sachin Tendulkar : सचिनच्या घराबाहेर बच्चू कडूंची 'बॅटिंग'; कार्यकर्त्यांसह आंदोलन, पोलिसांनी घेतले ताब्यात !

ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने राज्यातील महानगर पालिकासह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम अद्याप जाहीर होऊ शकलेला नाही. या प्रकरणाच्या सुनावणीला आत्तापर्यंत अनेकदा 'तारीख पे तारीख' मिळत आली आहे. आता ओबीसी आरक्षणासंबंधी याचिकेवर शुक्रवारी होणारी सुनावणीही पुढे ढकलल्यामुळे पुन्हा एकदा पदरी निराशाच पडली.

दरम्यान, राज्यातील मोठी मोठी प्रकरणे सुनावणीसाठी असल्यामुळे या प्रकरणावर सुनावणी होऊ शकली नव्हती. मुंबई महानगरपालिकेतील वॉर्ड रचनेसंदर्भातील सुनावणी मात्र झाली होती. त्यात राज्य सरकारने तीन आठवड्यांचा वेळ वाढवून मागितला होता. वारंवार तारखा पुढे ढकलत असल्याने निवडणुकांचे भवितव्य पुन्हा एकदा टांगणीला लागले आहे. आता १ सप्टेंबर रोजी यावर सुनावणी होणे अपेक्षित होती. आता ही सुनावणी २२ सप्टेंबर रोजी होणार आहे. यामुळे या प्रकरणी सुनावणीचा 'तारीख पे तारीख' असा सिलसिला कायम राहिल्याचे स्पष्ट झाले आहे.

Supreme Court
Swabhimani Shetkari Sanghatana News : 'स्वाभिमानी'चे प्रशांत डिक्कर उपोषण मंडपातून बेपत्ता ; प्रशासनाची धावपळ

राज्यातील ९२ नगरपालिका आणि जवळपास १५ महानगरपालिकांच्या निवडणुका या ओबीसी आरक्षण व बदललेल्या प्रभागरचनेमुळे कोर्टाच्या कचाट्यात अडकल्या आहेत. या निवडणुकांचा मुद्दा सुप्रीम कोर्टात गेला आहे. अनेक दिवसांपासून ही सुनावणी प्रलंबित आहे. या प्रकरणात अनेकदा सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली, तर अनेकदा कोर्टात युक्तिवाद होऊ शकला नाही. त्यामुळे आता नगरपालिकांसाठी ओबीसी आरक्षण लागू होणार की नाही याचा फैसला सुनावणीनंतरच समोर येणार आहे.

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला ग्रीन सिग्नल मिळाला आहे, पण या आधीच जाहीर झालेल्या ९२ नगरपरिषदांमध्येही हे आरक्षण मिळावे, यासाठी शिंदे सरकार सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. कोर्टाने आपल्या आधीच्या निर्णयाचे पुनर्विलोकन करावे, अशी मागणी सुप्रीम कोर्टाकडे करण्यात आली होती. यावर सुनावणी घेत ऑगस्ट २०२२ मध्ये न्यायालयाने स्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले, त्यानंतर आतापर्यंत या प्रकरणाची सुनावणीच होऊ शकलेली नाही. परिणामी गेल्या वर्षभर या सुनावणीकडे राज्याचे कायम लक्ष लागलेले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com