Raju Shetti : 'स्वाभिमानी'ला होमपिचवरच दणका ; यड्रावकरांच्या आशा पल्लवीत, तर उल्हास पाटलांचं गणित फिस्कटणार!

Swabhimani Shetkari Sanghatana : राजू शेट्टी यांच्या पराभवानंतर शिरोळ तालुक्याच्या राजकीय पटलावरील समीकरणे नव्याने मांडली जाणार आहेत.
raju shetti
raju shettisarkaranama
Published on
Updated on

Hatkangala Lok Sabha election Results : हातकणंगले लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांची आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या अस्तित्वाची लढाई सुरु झाली आहे. हाता-तोंडाला आलेला घास महायुतीने काढून घेत आगामी विधानसभा निवडणुकीचे कडवे आव्हान महाविकास आघाडी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेपुढे ठेवले आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बालेकिल्ला असणाऱ्या शिरोळ विधानसभा मतदारसंघात राजू शेट्टी यांचीच पीछेहाट झाल्याने विधानसभा निवडणुकीला चांगलीच कसरत करावी लागणार आहे. महायुतीला या मतदारसंघातून मिळालेले मताधिक्य आणि महाविकास आघाडीने घेतलेली मतांची आघाडी ही स्वाभिमानीच टेन्शन वाढवणारी गोष्ट आहे. या निकालामुळे विधानसभेला आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या(Rajendra Patil Yadravkar) आशा पल्लवीत झाल्या आहेत.

raju shetti
Sadabhau Khot : राजू शेट्टींचं काय चुकलं? सदाभाऊ खोतांच उत्तर...

राजू शेट्टी यांच्या पराभवानंतर शिरोळ तालुक्याच्या राजकीय पटलावरील समीकरणे नव्याने मांडली जाणार आहेत. खासदार धैर्यशील माने(Dharishsheel Mane) यांच्या विजयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक माधवराव घाटगे आदींचे प्रयत्न सार्थकी लागले आहेत. पण आगामी विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेसमोर कडवे आव्हान उभारले आहे.

तर 'स्वाभिमानी'मुळे(Swabhimani Shetkari Sanghatana) शिवसेना ठाकरे गटाची माजी आमदार उल्हास पाटील यांचे गणित फिस्कटणार अशी शक्यता या निकालामुळे निर्माण झाली आहे. कदाचित एकास एक असा उमेदवार या मतदारसंघातून निवडणुकीला सामोरे गेल्यास महायुतीला त्याचा फटका बसू शकतो.

raju shetti
Raju Shetti : "माझं काय चुकलं? प्रामाणिक असणे हा गुन्हा आहे का? शेतकऱ्यांनो तुम्हीही..."; राजू शेट्टी मनातून तिळ-तिळ तुटले

शिरोळ तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बालेकिल्ला आहे. तालुक्यातील शेट्टी यांनी जिल्हा परिषद सदस्य, आमदारकी, खासदारकी भूषविली. याच मतदारसंघातून या लोकसभेला स्वाभिमानीला मताधिक्य मिळेल असा विश्वास शेट्टी यांना होता. मात्र भाजपने वाढवलेली ताकद, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लावलेल्या जोडण्या आणि राजेंद्र पाटील यड्रावकर यांची यंत्रणा स्वाभिमानीला कूचकामी करण्यात यशस्वी ठरली.

शिवाय महाविकास आघाडीच्या सत्यजित पाटलांना मताधिक्य घेण्यापासून रोखण्यात यशस्वी ठरले. जर स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडी सोबत निवडणुकीला सामोरी गेली असतील तर याच मतदारसंघातून शेट्टी यांना 70 हजारांचे मताधिक्य मिळाले असते, असे राजकीय गणित होते. लढत त्रिशंकु झाल्याने मत विभाजनाचा फॅक्टर इथे महत्त्वाचा ठरला.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी(Raju Shetti) यांनी केलेली केलेली स्वतःची भूमिका येत्या विधानसभेला बाजूला सारून करताना विश्वासात घेऊन स्वाभिमानीचे धोरण ठरवणे गरजेचे आहे. कारण महाविकास आघाडीचे माजी आमदार उल्हास पाटील, गणपतराव पाटील यांनी गावागावांत प्रचार करत लोकसभेच्या निमित्ताने विधानसभेची पेरणी केली आहे.

महायुतीच्या विजयानंतर आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनाही उभारी देणारा हा निकाल ठरला आहे. लोकसभेत महायुतीचे गणित जमले असले तरी विधानसभेत मात्र यड्रावकर की, घाटगे असा तिढा निर्माण होऊ शकतो. शिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेला माजी आमदार उल्हास पाटील, गणपतराव पाटील यांचा अडथळा ठरू शकतो. या उलट महाविकास आघाडीची ही परिस्थिती तीच आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांच्यां आतापासूनच आशा पल्लवीत झाले आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com