राजू शेट्टींची २०१९ ला दिल्ली आणि २०२२ गल्लीही गेली!

KDCC Bank election : निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्याच्या राजकीय समीकरणांमध्ये कमालीचा बदल
Raju Shetti

Raju Shetti

Sarkarnama 

Published on
Updated on

शिरोळ : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा निकाल (KDCC Bank election) आज जाहिर झाला. यात सत्ताधारी छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीने २१ पैकी १८ जागा जिंकत बँकेतील वर्चस्व कायम राखले आहे. तर विरोधातील शिवसेना प्रणित राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडीला केवळ ३ जागांवर समाधान मानावे लागले आहे. मात्र या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्याच्या राजकीय समीकरणांमध्ये कमालीचा बदल झाला आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना (Shivsena) विरोधात गेली. तर सत्ताधारी काँग्रेस (Congress), राष्ट्रवादीच्या आघाडीच्या मैत्रीत भाजपची (Bjp) एन्ट्री झाली.

याच निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील आणखी एका दिग्गज नेत्याला आपली भूमिका बदलायला भाग पाडली. तो नेता म्हणजे माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) . कारखानदारांच्या विरोधात उभं राहुन आपलं राजकीय अस्तित्व तयार करणारे राजू शेट्टी हे या निवडणुकीत मात्र साखर कारखानदारांच्याच जवळ गेल्याचे पाहायला मिळाले. केवळ जवळच गेले नाहीत, तर राजू शेट्टी मतदानावेळी त्यांचे पोलिंग एजंट देखील बनले होते. त्यावेळचा प्रसंग संघटनेचे माजी पदाधिकारी दिलीप माणगावे यांनी सविस्तर लिहिला आहे.

<div class="paragraphs"><p>Raju Shetti</p></div>
शिवसेना खासदाराच्या मातोश्री पक्षाविरोधात लढल्या अन् दणक्यात निवडूनही आल्या

शिरोळच्या दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि या निवडणुकीतील शिरोळ तालुका विकास संस्था गटातील उमदेवार गणपतराव पाटील यांच्या बाजूने राजू शेट्टी यांनी ताकद उभी केली होती. मात्र राजू शेट्टी यांनी हिच भूमिका बदलणे कदाचित मतदारांच्या पचनी पडले नाही, आणि गणपतराव पाटील यांना पराभव स्विकारावा लागला आहे. राजेंद्र पाटील यड्रावकर यांना ९८ मते मिळाली, तर गणपतराव पाटील यांना ५२ मते पडली.

त्यामुळे आता ज्या उमेदवारासाठी शेट्टी अगदी पोलिंग एजंट बनले होते, त्याच उमेदवाराला पराभव स्विकारावा लागल्यामुळे शेट्टींसाठी २०१९ ला दिल्ली आणि २०२२ गल्लीही गेली अशी चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात सुरु आहे. २०१९ ला राजू शेट्टी यांचा हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांनी जवळपास ९५ हजार मतांनी पराभव केला होता.

<div class="paragraphs"><p>Raju Shetti</p></div>
आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर शिवसेनेसोबतच! खासदार मंडलिकांनी टाकला डाव

राजू शेट्टी पोलिंग एजंट बनले होते....

या प्रसंगाबाबत उल्लेख करताना दिलीप माणगावे लिहीतात, शिरोळ आणि हातकणंगले मतदारसंघातील स्वाभिमानी जनतेने विधानसभेत आणि लोकसभेत शेट्टींना ताठ मानेने पाठवले. कारखानदारांने मला मारले, असे म्हणत निवडणुकीत आपल्या रक्तबंबाळ झालेला चेहऱ्याचे पोस्टर दाखवत, जनतेला भावना प्रधान करीत शेट्टींनी मते मागितली. त्याचं कारखानदाराचे पोलिंग एजंट म्हणून शेट्टी एका बाकड्यावर बसले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com