
Swabhimani Shetkari Sanghatna : 'रत्नागिरी - नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या कोल्हापूर जिल्ह्यातील चोकाक ते अंकली या महामार्गातील शेतकऱ्यांना चौपट मोबदला मिळाल्याशिवाय भूसंपादन करू देणार नाही. प्रशासन व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून अनागोंदी कारभार सुरू असून याबाबतीत शासनाने आपली भूमिका स्पष्ट करावी, मगच मोजणीबाबत कार्यवाही करावी.' अशी ठाम भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी सोमवारी स्पष्ट केली. े
राजू शेट्टी म्हणाले, विकासकामांना शेतकऱ्यांचा विरोध नाही. मात्र शेतकऱ्यांची थडगी बांधून विकास करता येणार नाही. प्रशासन व सरकार दोघेही वेळकाढूपणा करू लागल्याने हा प्रकल्प रखडू लागला आहे. महाविकासआघाडी(MVA) सरकारने भूसंपादन कायदा बदलला यामुळे शेतकऱ्यांची राखरांगोळी झाली.
तसेच, शेतकरी वारवांर चौपट मोबदल्यासाठी हेलपाटे मारूनही याबाबत शासनाकडून कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाने चौपट मोबदल्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला आहे. मात्र राज्य सरकारने मंत्रिमंडळात सदर बैठकीस मान्यता न दिल्याने शासनस्तरावर हा प्रस्ताव धुळ खात पडला आहे. असंही राजू शेट्टी(Raju Shetti) म्हणाले.
भूमिअभिलेख विभागाकडून कोणतीही अद्यावत कागदपत्रे न तपासता तसेच संबधित शेतक-यांना नोटीसही लागू न करता रस्त्याची निविदा जाहीर करण्यात आलेली आहे. कोणत्या शेतक-यांची किती जमीन संपादित होणार आहे. याबाबतची काहीच निश्चिती नसताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ३०२ कोटी ५९ लाख भूसंपादनाची रक्कम दाखविली आहे.
जर भूसंपादनची नोटीस व कार्यवाहीच झाली नसेल, तर सदरची रक्कम कोणत्या आधारे दाखविली? प्रशासन व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जर हुकूमशाही पध्दतीने व जोर जबरदस्तीने कारभार करणार असेल तर त्यांना स्वाभिमानी स्टाईलने उत्तर देणार असल्याचे सांगितले.
(Edited by- Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.