Raju Shetti : राजू शेट्टींची मोठी घोषणा : लोकसभा स्वतंत्रपणे लढणार ; 'या' मतदारसंघातून दंड थोपटणार..

Raju Shetti News : लोकसभेच्या सहा जागा लढणार
Raju Shetty
Raju Shettysarkarnama
Published on
Updated on

Raju Shetti News : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी करण्यास सुरवात केली आहे. बैठका, मेळावे यांचे सत्र सुरु आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनीही आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. (swabhimani shetkari sanghatana will contest lok sabha independently)

राजू शेट्टी हे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून दंड थोपटणार आहेत. याबाबतची त्यांनी आज घोषणा केली. कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पक्षाची रणनीती स्पष्ट केली आहे. (Latest Marathi News)

Raju Shetty
Thackeray vs Shinde : सोळा आमदार अपात्रता कारवाईस वेग ; नार्वेकरांची निवडणूक आयोगाकडे धाव ; पक्षाची घटना..

स्वाभिमानी शेतकरी संघटना सहा ठिकाणी उमेदवार मैदानात उतरविणार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले. ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

राजू शेट्टी म्हणाले, "गेल्या (2019) लोकसभा निवडणुकीत गाफील राहिल्याने आमचा पराभव झाला.संघर्ष केला असतानाही पराभव झाला. मात्र, पराभवाने मी खचून जाणार नाही. लोकसभेच्या सहा जागा लढवणार असून या जागांवर उमेदवारी जाहीर करणार आहे,"

Raju Shetty
Nurseries education : शिक्षणमंत्री केसरकरांचा मोठा निर्णय ; आता गल्ली-बोळांतील बेकायदा नर्सरी..

"हातकणंगले लोकसभा निवडणूक मी जनतेच्या पाठिंब्यावर आणि लोकवर्गणीतून लढवणार आहे. स्वतंत्रपणे ही निवडणूक लढवणार आहे. आम्ही पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार आहोत," असे राजू शेट्टी म्हणाले. लोकसभा निवडणुकीत कुठल्याही पक्षाला आम्ही पाठिंबा देणार नसल्याचे त्यांनी यापूर्वी सांगितले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com