Thackeray vs Shinde : सोळा आमदार अपात्रता कारवाईस वेग ; नार्वेकरांची निवडणूक आयोगाकडे धाव ; पक्षाची घटना..

Maharashtra politics Thackeray vs Shinde : घटना ही निवडणूक आयोगाकडून मागवली असल्याची माहिती समोर येत आहे.
Thackeray Vs Shinde
Thackeray Vs Shinde Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra politics Thackeray vs Shinde : राज्यातील राजकारणातील (Maharashtra politics) मोठी बातमी समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला. याबाबत मोठी अपडेट आहे.

यामध्ये शिवसेनेच्या सोळा आमदारांच्या अपात्रतेचा आणि मूळ पक्ष कोणाचा हे ठरवण्याचा अधिकार विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याकडे दिला आहे. ठाकरे गट-शिंदे गटाची घटना हा मुद्दा या प्रकरणात महत्वाचा आहे.

Thackeray Vs Shinde
Nurseries education : शिक्षणमंत्री केसरकरांचा मोठा निर्णय ; आता गल्ली-बोळांतील बेकायदा नर्सरी..

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना पक्षाची घटना ही विधीमंडळ किंवा दोन्ही गटाऐवजी निवडणूक आयोगाकडून मागवली असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या सोळा आमदाराच्या अपात्रतेच्या कारवाईस वेग आल्याचे दिसते.

Thackeray Vs Shinde
Karnataka Politics : कर्नाटकात आज 'हे' २४ आमदार होणार मंत्री..

कोर्टाच्या निकालात एका ठराविक वेळेत (रिझनेबल टाईम) हा निर्णय घ्यावा असं सांगण्यात आलं आहे. हा निकाल ठराविक वेळेत देणं गरजेचं असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सांगण्यात येत आहे. पण या निकालासाठी अध्यक्ष कितीही वेळ घेऊ शकतात, तो त्यांचा अधिकार असल्याचं सत्ताधारी पक्षाकडून सांगण्यात येत आहे.

“सुप्रीम कोर्टाने सांगितल्याप्रमाणे मला वाजवी वेळेत (reasonable time) मध्ये निर्णय घ्यायचा आहे. तो कालावधी किती दिवसांचा असेल हे मी तुम्हाला आता सांगू शकत नाही. कारण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जेवढा वेळ लागेल , तितकाच वेळ हा वाजवी कालावधी असेल," असे नार्वेकरांनी स्पष्ट केलं आहे.

सोळा आमदार अपात्र झाले तर बाकी आमदारांचे काय होणार? यावर राहुल नार्वेकर म्हणाले, या देशात कायदा सर्वांना समान आहे. देशातील प्रत्येक आमदारासाठी समान कायदा लागू असेल. याचिकांमध्ये केलेले आरोप सिद्ध झाले तर आमदारांवर कारवाई करण्यात येईल.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com