Satara News : एफआरपीवरून राजू शेट्टींचा केंद्रावर निशाणा...म्हणाले, डोंगर पोखरून उंदराची पिल्ले...

Central Government केंद्र सरकारने एफआरपीत प्रतिटनास शंभर रुपयांची वाढ केली आहे, यावरून आज खासदार राजू शेट्टी यांनी टीकेची झाोड उठवली आहे.
Raju Shetty
Raju Shettysarkarnama
Published on
Updated on

Raju Shetty News : केंद्र सरकारने एफआरपीमध्ये क्विंटलला दहा रुपये म्हणजेच प्रति टनास शंभर रुपयांची वाढ करून शेतकऱ्यांना मोठी मदत केल्याचा डांगोरा पिटत आहे. वास्तविक पाहता केंद्र सरकारने आज जी दहा रुपयांची वाढ केली आहे, ती कोणत्या आधारे केली. उत्पादन खर्च कोणता धरला. केंद्र सरकारने आजची केलेली वाढ ही डोंगर पोखरून उंदीर नव्हे तर उंदराची पिल्ले हाताला लागल्याचा प्रकार असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केली आहे.

केंद्र सरकारने Central Government एफआरपीत प्रतिटनास शंभर रुपयांची वाढ केली आहे, यावर आज खासदार राजू शेट्टी Raju Shetty यांनी टीकेची झाोड उठवली आहे. शेट्टी यांनी म्हटले की, वास्तविक पाहता उत्पादन खर्चात गेल्या वर्षभरात जवळपास 33 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

यामध्ये रासायनिक खतांची वाढ ही 22 टक्क्याहून अधिक वाढलेली आहे. यामुळे आज झालेली वाढ ही फक्त सव्वातीन टक्के असल्याने यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. सध्या उसाची शेती ही तोट्याची शेती झालेली आहे.

Raju Shetty
Satara BJP News : विरोधकांच्या वज्रमुठीला तडे; सर्वसामान्‍य जनता मोदींसोबतच : चंद्रकांत पाटील

कृषी मूल्य आयोगामध्ये बसलेल्या विद्वानांनी एक टन उसाचा खर्च १५७० रुपये दाखवलेला आहे व त्या उत्पादन खर्चावर आपण ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दुप्पट पैसे देत आहोत, हा डांगोरा पेटवत आहे. कृषी मूल्य आयोगाने कोणत्या संशोधन केंद्रामध्ये अथवा देशातील कोणत्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये इतक्या खर्चात काढला हे दाखवून द्यावे.

सरकारने साखर कारखानदारांना खुश करण्यासाठी ही एफआरपी वाढवलेली आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वाढलेल्या महागाईमुळे व उत्पादन खर्चामध्ये जवळपास 52 टक्केची वाढ झालेली आहे. यामध्ये रासायनिक खते ,मजुरी ,मशागत, तोडणी वाहतूक ,खते ,कीटकनाशके यांचे दर गगनाला जाऊन भिडलेले आहेत. या सर्व गोष्टींचा विचार केल्यास गेल्या पाच वर्षात फक्त शेतकऱ्यांना टनाला 350 रुपयाची वाढ मिळालेली आहे.

Raju Shetty
Sadabhau Khot: ऊस उत्पादकांना FRP रक्कम एकरकमीच मिळावी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com