Raju shetti: शेतकऱ्यांच्या प्रोत्साहनपर अनुदानाच्या प्रश्नावर राजू शेट्टी आक्रमक; मुख्यमंत्र्यांना विचारणार जाब !

Eknath Shinde: मंगळवारी (दि.13 जून) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत.
Raju shetti
Raju shettiSarkarnama
Published on
Updated on

Kalhapur News: राज्य सरकारकडून सध्या 'शासन आपल्या दारी' हा उपक्रम विविध ठिकाणी राबवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवरच उद्या (दि.13 जून) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून जाब विचारणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे.

उसाच्या अंतिम बिलासंदर्भात आणि ऊसदर नियंत्रण समिती संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या दरबारात जाऊन आपण जाब विचारणार आहोत, असं राजू शेट्टी म्हणाले आहेत. याबरोबरच 'शासन आपल्या दारी' ही संकल्पना चांगली आहे पण ही प्रचार करणारी संकल्पना आहे, असा खोचक टोला त्यांनी लगावला.

Raju shetti
Supriya Sule On CM Shinde : शिंदे गटातील पाच मंत्र्यांना काढण्याचा भाजपचा सल्ला म्हणजे....: सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचा दुखण्यावर बोट ठेवले

राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भातील अनेक प्रश्न उपस्थित करत सांगितलं की, "राज्य सरकारने गेल्या 14 महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम दिलेली नाही. प्रामाणिक शेतकऱ्यांनी कर्ज भरून देखील त्यांना 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळालेलं नाही. शासन इतकं गतिमान असतं तर गेल्या दोन वर्षात शेतकऱ्यांच्या अंतिम बिलाची रक्कम थकलेली आहे ती मिळाली असती, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Raju shetti
Cabinet expansion News : भाजपश्रेष्ठींनी वगळायला सांगितलेले शिंदे गटाचे पाच मंत्री कोणते?

दरम्यान, गेली एक वर्ष शेतकऱ्यांची रक्कम साखर कारखाने बिनव्याजी वापरत आहेत. ऊस दर समिती नसल्याने उसाचा अंतिम दर ठरत नाही. समिती निश्चित करायला सरकारकडे वेळ नाही आणि हे शासन गतिमान आहे असं फक्त सांगितलं जातंय, अशी टीकाही त्यांनी केली. याबाबत मुख्यमंत्र्यांना जाब विचारणार असल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com