BRS offered CM Post To Raju Shetti : पंकजा मुंडेंनंतर 'बीआरएस'चा राजू शेट्टींना मुख्यमंत्रीपदाची ऑफर; शेट्टी म्हणाले...

Raju Shetti On BRS Offered : मागील चार महिन्यांपासून मी आणि राव संपर्कात...
BRS offered CM Post To Raju Shetti :
BRS offered CM Post To Raju Shetti : Sarkarnama

Pashchim Maharashtra News : भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि तेलंगणचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (KCR) यांनी महाराष्ट्रात आपलं राजकीय अस्तित्व निर्माण करण्याच्या प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे काही नेते राव यांच्या बीआरएसमध्ये दाखल झाले आहेत.बीआरएसने भाजपच्या दिग्गज नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती, मात्र मुंडे यांच्याकडून कसलाही प्रतिसाद देण्यात आलेला नव्हता. (Latest Marathi News)

बीआरएसने आधी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर देण्यात आली होती. पंकजा मुंडे यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाल्याने, आता बीआरएसने थेट स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांनाच मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली आहे.

BRS offered CM Post To Raju Shetti :
Fadnavis Gets Emotional: 'त्या' क्षणाने फडणवीसांच्याही डोळ्यांत पाणी आलं..

मात्र बीआरसने दिलेली ही ऑफर राजू शेट्टी यांनी नाकारली आहे. मागील चार महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपासून मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव संपर्कात असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले आहे. दरम्यान, राजू शेट्टी यांनी युती आघाडी पासून दुरावल्यानंतर आता एकला चलो रे चा पवित्रा घेतला आहे. यासोबतच त्यांनी बीआरएस आपल्या स्वाभिमानीतील काही नेत्यांना फोडत असल्याचा आरोपही त्यांनी बीआरएसवर केला आहे.

भारत राष्ट्र समितीने महाराष्ट्रात आपल्या पक्षविस्ताराच्या अनुषंगाने के. चंद्रशेखर राव प्रयत्नशील आहेत. याचसाठी राव हे दोन दिवसीय महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर आहेत. पक्षविस्तारासाठी राव यांनी आषाढी यात्रेचं निमित्त साधलं आहे. पंढरपुरातील विठुरायाचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी तुळजाभवानींचही दर्शन घेतलं.

BRS offered CM Post To Raju Shetti :
BRS In Maharashtra : तेलंगणातील शेतकरी आत्महत्या शून्यावर, आता महाराष्ट्राची स्थिती बदलण्यासाठी सर्व निवडणुका लढणार; 'बीआरएस'चा एल्गार...

पंढरपुरात दर्शन घेतल्यानंतर केसीआर यांनी तुळजाभवानीचंही दर्शन घेतलं. त्याच्या या दौऱ्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगीरथ भालके यांनी बीआरएसमध्ये पक्षप्रवेश केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com