तडजोडीच्या आंदोलनाचा फायदा शेट्टी, खोतांना ; शेतकऱ्यांचे काय?

राज्यात उसाला एफआरपी असते हे माजी खासदार राजू शेट्टींमुळे (Raju Shetty)शेतकऱ्यांपर्यंत पोचले, यात शंका नाही. दरासाठी होणारे तीव्र आंदोलनात आणि त्यानंतर तडजोडीने निघणार दर शेतकऱ्यांना दिला जात नाही.
Raju Shetty Sadabhau Khot
Raju Shetty Sadabhau Khotsarkarnama
Published on
Updated on

-सुनील पाटील

कोल्हापूर : माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty), भाजपचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (Swabhimani Shetkari Sanghatana) कार्यकर्त्यांनी कारखान्यांना वठणीवर आणत जेवढी एफआरपी आहे तेवढा दर देण्यास भाग पाडले.

याबदल्यात शेतकऱ्यांनीही त्याची जाण राखत शेट्टी यांना निर्विवादपणे खासदार केले. सदाभाऊ खोतही भाजपमधून का असेना पण मंत्रीही झाले. संघटनाच्या आंदोलनाचा शेतकऱ्यांना जसा फायदा झाला तसा शेट्टी आणि खोत यांनाही फायदा झाला आहे. आता मात्र, सर्वच संघटनांनी शेतकऱ्यांचा विचार करावा लागणार असल्याचे चित्र आहे. कारण आंदोलन आता शेतकऱ्यांना परवडणार नसल्याचे चित्र आहे. 

Raju Shetty Sadabhau Khot
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानं चंद्रकांत पाटलांची केली 'चंपी'

जिल्ह्यात दोनवर्षापासून अतिवृष्टी आणि पूरामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. पूरबाधित शेतकऱ्यांना शासनाकडून वेळेत आणि अपेक्षीत मदत मिळत नाही. एकीकडे खते, वीज, पाणी पटटी, मजूरीचे दर वाढत थांबत नाही. दुसरीकडे हातातोंडाला आलेली पिक कशी वाचवायची असा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर आहे.

माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना उसाची एफआरपी मिळवून दिली. ज्यावेळी उसाला 700 ते 800 रुपये प्रतिटन दर होता. त्यावेळी कारखान्यांकडून 400 ते 450 रुपये दर दिला जात होता. अशामध्ये शेट्टी, सदाभाऊ खोत व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कारखान्यांना वठणीवर आणत जेवढी एफआरपी आहे. तेवढा दर देण्यास भाग पाडले. याबदल्यात शेतकऱ्यांनीही त्याची जाण राखत शेट्टी यांना निर्विवादपणे खासदार केले. सदाभाऊ खोतही भाजपमधून का असेना पण मंत्रीही झाले. संघटनच्या आंदोलनाचा शेतकऱ्यांना जसा फायदा झाला तसा शेट्टी आणि खोत यांनाही फायदा झाला आहे. आता मात्र, सर्वच संघटनांनी शेतकऱ्यांचा विचार करावा लागणार असल्याचे चित्र आहे.

राज्यात उसाला एफआरपी असते हे माजी खासदार राजू शेट्टींमुळे (Raju Shetty)शेतकऱ्यांपर्यंत पोचले, यात शंका नाही. दरासाठी होणारे तीव्र आंदोलनात आणि त्यानंतर तडजोडीने निघणार दर शेतकऱ्यांना दिला जात नाही. त्यामुळे स्वाभिमानीकडून जेवढी मागणी करणार आहे, ती पूर्ण व्हावी, नाहीतर केवळ स्वाभिमानीची दखल घ्यावी म्हणून केले जाणारे आंदोलन आता शेतकऱ्यांना परवडणार नसल्याचे चित्र आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com