राजू शेट्टींनी थोपटले दंड; एकरकमी एफआरपी चे आंदोलन पेटले

FRP Protest| Raju Shetty|Sangali सांगली जिल्ह्यातील एक खासगी कारखानाही एकरकमी पैसे देऊ शकतो. मग जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील मोठे कारखानदार एक रकमी एफआरपी का देऊ शकत नाहीत
FRP Protest
FRP Protest

सांगली : उसाची एक रकमी 'वाजवी आणि फायदेशीर किंमत' (FRP) आणि दिवसभरात किमान दहा तास वीज पुरवठा केला जावा, या प्रमुख मागणीसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (Swabhimani Shetkari Sanghatna) वतीने सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक तिरडी मोर्चा काढण्यात आला. यावेळी भर रस्त्यातच राजू शेट्टी यांचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली. कारखानदारांचा प्रतिकात्मक पुतळा काढून घेताना झालेल्या या धक्काबुक्कीमुळे रस्त्यावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.  

FRP Protest
मुख्यमंत्री खरे की मिसेस मुख्यमंत्री?- किरीट सोमय्या

सांगली जिल्ह्यातील एक खासगी कारखानाही एकरकमी पैसे देऊ शकतो. मग जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील मोठे कारखानदार एक रकमी एफआरपी का देऊ शकत नाहीत, असा खडा सवालच संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju shetty) यांनी यावेळी केला. पण येथे रक्षकच भक्षक बनले आहेत. या साखर कारखानादारांना पालकमंत्र्यांचा आश्रय आहे. पण आम्ही एफआरपीचे तुकडे होऊ देणार नाही. एकरकमी एफआरपी घेणारच, असेही राजू शेट्टींनी ठणकावून सांगितले.

ऊस दर नियंत्रण कायद्यानुसार 14 दिवसात उसाचे बिल न दिल्यास शेतकऱ्यांना पंधरा टक्के व्याज देण्याची तरतूद आहे. पण, सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनी शेतकऱ्यांचे पैसे अडवून ठेवले असल्याचा आरोपही यावेळी राजू शेट्टींना केला.

मोर्च्यावेळीही कारखानदारांचे प्रतिकात्मक मढे घेऊन आम्ही जिल्हा प्रशासनाकडे निघालो असताना पोलिसांनी आमच्याकडून प्रतिकात्मक मढे काढून घेतले. त्यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापटी झाल्या. भर रस्त्यात मढे पडले आणि विटंबना झाली, याला सर्वस्वी पोलीस जबाबदार आहेत. सांगली जिल्ह्यातील कारखानदारी मेलेली आहे. पालकमंत्री जयंत पाटील याचे नेतृत्तव करत आहेत. पण रडीचा डाव खेळून पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली साखर कारखान्याचे टोळके निर्माण झाले आहे. यांनीच शेतकऱ्यांच्या घरावर दरोडा घातला आहे. पण बिळात बसले असले तरी बिळात हात घालून एकरकमी एफआरपी घेणार, असा इशाराच राजू शेट्टी यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com