मुख्यमंत्री खरे की मिसेस मुख्यमंत्री?- किरीट सोमय्या

kirit Somaiya|Shivsena| BJP दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केल्याने गावात काही वेळासाठी तणाव निर्माण झाला होता.
Uddhav Thackeray-Kirit Somaiya
Uddhav Thackeray-Kirit Somaiya Sarkarnama
Published on
Updated on

रायगड : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) आणि मनिषा वायकर यांनी १९ बंगल्याचा कर भरल्याचा दावा केला होता. तर शिवसेनेने त्यांचा हा दावा साफ फेटाळून लावला होता. त्यासंबंधी कोर्लाई गावचे सरपंच प्रशांत मिसाळ यांनीही याबाबत खुलासा केला होता. मात्र किरीट सोमय्या हे बंगल्याची वास्तवता दाखवण्यासाठी (Kirit Somaiya) अलिबागला पोहचले आहेत. रश्मी ठाकरे आणि माजी मंत्री रविंद्र वायकर यांच्या पत्नी मनिषा वायकर यांच्या जमिनीची पाहणी करणार आहेत.

दरम्यान यावेळी किरीट सोमय्या समर्थक आणि शिवसेना समर्थक चांगलेच आक्रमक झाले पाहताना दिसले. त्यामुळे गावात तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी कार्यकर्त्यांना अडवून धरले होते. भाजप -शिवसेनेचे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. सरुवातीला शांततेचा पवित्रा घेतलेल्या शिवसैनिकांनी सोमय्यांसोबत आलेला ताफा पाहताच जोरदार घोषणाबाजी सुरू केली. यावेळी त्यांचा ताफाही अडवण्याचाही प्रयत्न झाला. किरीट सोमय्यांना ग्रामपंचायतीच्या कार्यालयात जाताना पाहताच शिवसैनिकांनीही ग्रामपंचायत कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, सोमय्यांच्या सुरक्षा रक्षकांनी शिवसैनिकांना बाहेरच थोपवून धरले. मात्र, सोमय्या पंचायत कार्यालयातून बाहेब पडल्यानंतर शिवसैनिकांनी सोमय्या आले त्या जागेवर गोमूत्र आणि दूध शिंपडून शुद्धीकरण केलं.

Uddhav Thackeray-Kirit Somaiya
महाविकास आघाडीत बिघाडी? मंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध जितेंद्र आव्हाड वाद पेटला

सोमय्या पंचायत समितीच्या कार्यालयात गेल्यानंतर अवघ्या पाचच मिनिटात ते बाहेर आले. सोमय्यांनी आणि प्रशांत ठाकूर यांनी सरपंच प्रशांत मिसाळ यांना एक पत्रं यांना दिलं. तर सोमय्यांनी कार्यालयात एका शब्दानेही आमच्याशी चर्चा केली नाही, अशी प्रतिक्रिया सरपंच मिसाळ यांनी दिली. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी रेवदंडा पोसीस स्टेशनमध्ये १९ बंगल्यांच्या तपासाबद्दल अर्ज दिला.

कोर्लई ग्रामपंचायतीत संरपंच व उपसरपंचांशी दहा मिनिटं चर्चा झाली. पण हे स्वाभाविक आहे सत्तेसाठी तो सरपंच सकाळी म्हणतो बंगले आहेत आणि दुपारी सांगतो बंगले गायब झाले. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी म्हणतात की माझे बंगले आहेत. मग यातलं खरं काय असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी, सरंपंच, शिवसेना कार्यकर्ते बंगले नाहीत म्हणतात, म्हणून पोलीस स्टेशनला यावं लागलं. असंही किरीट सोमय्यांनी सांगितलं.

विशेष म्हणजे कोर्लई ग्रामपंचायत कार्यालायात आमची व्यवस्थित चर्चा आणि गाठीभेटी झाल्या. पुण्यासारखा प्रकार इथे घडला नाही. पुण्यात तर उद्धव ठाकरेंनी गुंडांनाच लाठी-काठी आणि दगडं घेऊन पाठवलं होतं, असा आरोपही त्यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com