Pune News : महाराष्ट्रात उदयनराजे भोसले यांनी सातारा आणि पीयूष गोयल यांनी उत्तर मुंबईमधून लोकसभा निवडणूक लढवून ती जिंकली होती.त्यामुळे महाराष्ट्रात राज्यसभेच्या दोन जागा रिक्त झाल्या होत्या. या दोन जागांसाठी राज्यसभेची पोटनिवडणूक येत्या 3 सप्टेंबरला होत आहे. भाजपने मंगळवारी (ता.20) महाराष्ट्रातून धैर्यशील पाटील यांना संधी देतानाच एक जागा अजित पवारांना सोडली आहे.
त्यामुळे भाजपने लोकसभा निवडणुकीवेळी अजित पवारांनी उदयनराजेंसाठी घेतलेल्या माघारीची परतफेड केली आहे. त्यामुळे अजित पवार (Ajit Pawar) यांचा राजेश विटेकरांना आमदार केल्यानंतर आता नितीन पाटील यांना खासदार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या रोखठोक स्वभाव आणि दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी ओळखले जातात. एखाद्याला शब्द दिला की तो वाट्टेल ती किंमत मोजून तो खरा करुन दाखवायचा हेच अजितदादांना ठाऊक असते.लोकसभा निवडणुकीवेळी परभणी सर्व तयारी करुनही रासपच्या महादेव जानकरांमुळे आपली तलवार म्यान करावी लागली. त्यांना विधान परिषदेचा आमदार करतो हा शब्द अजित पवारांनी दिला आणि तो पूर्ण करत आमदारकी मिळवून दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून सातारच्या नितीन पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी मिळणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाईतील सभेत साताऱ्याची जागा निवडून आणल्यास नितीन पाटील यांना खासदार करतो,असा शब्द दिला होता. तोच शब्द त्यांनी पूर्ण केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
राज्यसभेच्या दोन जागांपैकी एक जागा राष्ट्रवादीला सोडण्यात येणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली होती. त्यावेळी त्यांनी राज्यसभेच्या महाराष्ट्रात दोन जागा रिक्त आहेत. त्यापैकी एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला देण्याचे आम्ही यापूर्वीच कबूल केले आहे. याबाबत पक्षाची संसदीय समिती योग्य तो निर्णय घेईल. त्यात एक जागा अजित पवारांच्या गटाला एक जागा देण्यात येईल,असं फडणवीसांनी अगोदरच स्पष्ट केली.
अजित पवारांनी नितीन पाटलांना राज्यसभेचा खासदार करतो हा शब्द दिल्यानंतर सातारा भाजपमध्ये अस्वस्थता पसरली होती. सातारामधून राज्यसभेवर भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी द्या,असा ठरावही करण्यात आला होता. मात्र,राज्यसभेची निवडणूक लागताच मकरंद पाटील व नितीन पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.