Udayanraje Bhonsle : साताऱ्यात मोठी घडामोड, सुधा मूर्तींनी घेतली खासदार उदयनराजेंची भेट; नवीन प्रकल्प की..?

Rajya Sabha MP Sudha Murthy Meet Chhatrapati Udayanraje Bhonsle : राज्यसभेच्या खासदार डॉ. सुधा मूर्ती यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
Chh. Udayanraje Bhosale meet sudha murty
Chh. Udayanraje Bhosale meet sudha murtySarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Udayanraje Bhosale : इन्फोसिस फाउंडेशनच्या संस्थापिका, राज्यसभेच्या खासदार डॉ. सुधा मूर्ती (Dr. Sudha Murthy) यांनी खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचवला पाहिजे, असेही त्या यावेळी म्हणाल्या.

या भेटीदरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा पुतळा भेट देऊन उदयनराजेंनी त्यांचे स्वागत केले.

इन्फोसिस कंपनीने माध्यमातून साताऱ्यात आयटी केंद्र उभारावे अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. यासाठी आयटी कंपनी सुरू करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करू, असे उदयनराजे भोसले यांनी सांगितले.

Chh. Udayanraje Bhosale meet sudha murty
Shivaji Maharaj Wagh Nakh : शिवशस्त्रशौर्यगाथा! ...अखेर ज्याची आतुरता होती, त्या अभिमानास्पद क्षणाचे खास फोटो

सुधा मूर्ती यांनी पहिल्यांदाच राज्यसभेत आपलं केलं. त्यावेळी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावाच्या चर्चेवर बोलत होत्या. सुधा मूर्ती यांनी संसदेतील पहिल्याच भाषणात महिलांच्या आरोग्य, जागतिक वारसास्थळे, विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड, दुर्ग व देशांतर्गत पर्यटन या मुद्द्यांचा उल्लेख केला होता. त्याबद्दल उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Chh. Udayanraje Bhosale meet sudha murty
Rajya Sabha Election : भोसले, गोयल यांच्या जागेवर कोण? महाराष्ट्रासह 9 राज्यांमधील राज्यसभेच्या 12 जागांसाठी निवडणूक

सुधा मुर्ती यांना साताऱ्याला भेट देण्याचे निमंत्रणही उदयनराजे यांनी दिले. प्रकल्प उभारण्यात सकारात्मक प्रतिसाद देऊन योग्य ती मदत करण्याचे आश्वासन मूर्ती यांनी दिले. यावेळी प्रतापगड प्राधिकरणाचे सदस्य चंद्रकांत पाटील, सोमनाथ धुमाळ, छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीचे सदस्य संग्राम बर्गे, ॲड. विनीत पाटील, संदीप शिंदे आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com