एकनाथ शिंदे गटाचे पंढरपुरात शक्तीप्रदर्शन; मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांची हजेरी

या मेळाव्याला सोलापूरसह राज्यातील दिग्गज नेते हजेरी लावणार आहेत.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

पंढरपूर : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाचा आज (ता. १० जुलै) राज्यातील पहिला कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्याला सोलापूरसह राज्यातील दिग्गज नेते हजेरी लावणार आहेत. (Rally of Eknath Shinde group in Pandharpur)

पंढरपूरपासून जवळ असलेल्या टाकळी येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी सोलापूर जिल्ह्यातून शिंदे गटाचे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी होणार आहेत. त्यांच्यासोबत शिंदे गटाचे अनेक आमदारदेखील उपस्थित राहणार आहेत. कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदे काय संदेश देतात, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

Eknath Shinde
राज्यसभा निवडणुकीत खेळ बिघडवलेला आमदार शहा अन् नड्डांच्या भेटीला दिल्लीत

दरम्यान, सोलापुरातून एकनाथ शिंदे यांना आमदार तानाजी सावंत आणि सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांची साथ मिळाली आहे. तसेच, करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनीही शिंदेंना समर्थन दिले आहे. मागच्या सरकारमध्ये सोलापूरचे पालकमंत्री हे बाहेरचे होते. यावेळी शिंदे ही कमान तानाजी सावंतांकडे सोपवणार का अशी चर्चा रंगली आहे. स्वतः सावंत हे सोलापूरच्या पालकमंत्रीपदासाठी इच्छूक आहेत. तसेच आपल्या अनोख्या भाषाशैलीमुळे राज्यात परिचित झालेले शहाजी पाटील यांच्या पदरात काय पडणार? याकडे सोलापूरकरांचे लक्ष असणार आहे.

Eknath Shinde
अजितदादांनी सांगितले शिंदे-फडणवीसांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार न होण्याचे कारण...

आमचं सरकार कायदेशीर

दरम्यान, महापूजेनंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आम्ही हे राज्य लोकशाहीच्या माध्यमातून स्थापन केलं आहे. या राज्यात कायदा, घटना, नियम आहे, त्याच्याबाहेर कुणाला जाता येत नाही. लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व आहे. आकड्यांना महत्व असतं. शिवसेना .प्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचाराचं सरकार या राज्यात स्थापन केलं आहे. आम्ही कायदेशीर सरकार स्थापन केलं आहे. आमचं सरकार बेकायदेशीर असल्याची मागणी कोणी केली असेल तर न्यायालय त्याबाबत निर्णय देईल. न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com