Kolhapur Politics : भाजपमध्ये नवख्यांना मोदी लवकर कळले; जुन्या-नव्यात चढाओढ

Ram Mandir Pran Pratishtha Ceremony Kolhapur Bjp Leaders Celebration : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा कोणी जल्लोषात साजरा केला? भाजपमध्ये चढाओढ...
Dhananjay Mahadik
Dhananjay MahadikSarkarnama
Published on
Updated on

Ram Mandir Inauguration Kolhapur News :

महायुती एकसंध दाखवण्यासाठी नुकताच महायुतीचा मेळावा पार पडला. यावेळी भाजपचे नेते सुरेश हाळवणकर यांनी आमदार प्रकाश आवाडे यांना चिमटा काढला होता. आमच्यापेक्षा आवाडेंना मोदी लवकर आणि जास्त कळाले, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याची चर्चा इचलकरंजी मतदारसंघात अधिक रंगली.

अयोध्येतील श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर हाळवणकरांच्या या वक्तव्याची पुष्टी झाल्याची चर्चा Kolhapur जिल्ह्याच्या राजकारणात सुरू आहे. कारण भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांपेक्षा हा सोहळा घरोघरी पोहोचवण्यामागे नवख्या आणि अपक्षांची भूमिका महत्त्वाची ठरली.

Dhananjay Mahadik
Maratha Reservation : राज्य सरकारचं चुकलं; मराठा आरक्षणाबाबत संभाजीराजेंनी जे सांगितलं तेच...

अयोध्येतील राम मंदिर आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर घरोघरी हा सोहळा उत्साहात साजरा करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले होते. त्यासाठी भाजपच्या स्थानिक लोकप्रतिनिधींकडून याबाबतची यंत्रणा कार्यान्वित करण्याचे संदेश वरिष्ठांकडून आले होते. मात्र कोल्हापूर जिल्ह्यात जुन्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांपेक्षा अधिक भाजपमधील नवीन चेहरे, लोकप्रतिनिधी आणि अपक्ष आमदार हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी पुढे होते.

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे आणि त्यांचे पुत्र राहुल आवाडे या कार्यक्रमात स्वतः रस्त्यावर उतरले. त्यांनी गेल्या पंधरा दिवसांपासून तयारी सुरू केली होती. भव्य शोभायात्रा काढत प्रभू श्रीराम मंदिराची अक्षता, कलशपूजन, शोभायात्रा काढत आणि इचलकरंजी शहरात पोस्टर लावत मोठ्या उत्साहात सोहळा साजरा केला. दुसरीकडे त्याच मतदारसंघातील भाजपचे नेते सुरेश हाळवणकर यांनी आपल्या परीने उत्साहात हा सोहळा साजरा केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दुसरीकडे पन्हाळा शाहूवाडीचे आमदार विनय कोरे हेदेखील या सोहळ्यापासून दूर नव्हते. प्रभू श्रीरामाचे 72 फुटी कटआउट उभा करून जवळपास 5000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग असलेल्या विद्यार्थ्यांनी या शोभायात्रेत सहभाग घेतला होता. पन्हाळा-शाहूवाडी मतदारसंघात सर्वात मोठा सोहळा आमदार विनय कोरे यांनी साजरा केला.

कोल्हापूर शहरात जवळपास 40 पेक्षा अधिक हिंदू संघटना यांना एकत्र करून राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात भव्य सोहळा केला. प्रभू श्रीरामाचे 108 फूट कटआउट उभे करीत शोभायात्रा काढत आणि भव्य मंदिर साकारत करवीरवासीयांच्या मनात उतरले.

एकीकडे भाजपमध्ये सुरू असलेला जुन्या-नव्या वादामुळे भाजपमधील अंतर्गत धुसफुस चव्हाट्यावर येत आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर जुन्यांपेक्षा नवख्या पदाधिकाऱ्यांनी दिलेला प्रतिसाद हा चर्चेचा विषय ठरत आहे.

edited by sachin fulpagare

R...

Dhananjay Mahadik
Sambhajiraje News : संभाजीराजेंच्या खासदारकीचा मार्ग खडतर; राज्यसभेला जी अडचण झाली, तीच लोकसभेला?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com