CM Ladki Bahin Yojana : सर्वसामान्य महिलांच्या खात्यांवर जाणारे पैसे प्रणिती शिंदेंना खुपत आहेत; राम सातपुतेंचा पलटवार

Ram Satpute counterattack on Praniti Shinde : विद्यमान खासदारांनी खासदार झाल्यापासून सोलापूरच्या हितासाठी एक तरी पत्र दिले का? सोलापूरसाठी, विकास कामांसाठी त्यांनी काय केले हे सांगावे?
Ram Satpute-Praniti shinde
Ram Satpute-Praniti shindeSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 23 August : सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेला निवडणूक स्टंटबाजी असे संबोधले होते. त्याचा भाजप आमदार राम सातपुते यांनी समाचार घेताना प्रणिती शिंदेंवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. महिलांचे उत्थान झाले पाहिजे, महिला आत्मनिर्भर झाल्या पाहिजेत, हे खासदार प्रणिती शिंदे यांच्या डोळ्यात खुपत आहे, असा आरोप सातपुते यांनी केला.

दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने आमदार राम सातपुते (Ram Satpute) सोलापूरमध्ये आले होते. त्या वेळी लाडकी बहिण योजनेवर टीका करणाऱ्या प्रणिती शिंदेंचा (Praniti shinde) खरपूस शब्दांत समाचार घेतला. गरिबांच्या घरात दोन रुपये जात आहेत, हे काँग्रेसला न पटणारी गोष्ट आहे. विद्यमान खासदारांनी खासदार झाल्यापासून सोलापूरच्या हितासाठी एक तरी पत्र दिले का? सोलापूरसाठी, विकास कामांसाठी त्यांनी काय केले हे सांगावे.

मी निवडणुकीत म्हणायचो, काम करणारा खासदार निवडून आला पाहिजे. मात्र, जनतेने दिलेला कौल आम्ही स्वीकारला आहे. त्यामुळे स्टंटबाजी कोण करतंय, हे सोलापूरकरांना चांगलं माहिती आहे. सोलापूरकर (Solapur) या स्टंटबाजीचा हिशेब नक्की ठेवतील, असा इशाराही राम सातपुते यांनी प्रणिती शिंदेंना दिला.

Ram Satpute-Praniti shinde
Priyanka Gupta : एकनाथ शिंदेंवर काँग्रेसचा पलटवार; ‘मुलींच्या सुरक्षेसाठी काँग्रेस ते राजकारण करेल’

लाडकी बहीण योजनेतून एका एका मतदारसंघात 50 ते 60 महिलांच्या खात्यावर थेट पैसे गेले आहेत. सामान्य जनतेच्या खात्यावर पैसे गेले नाही पाहिजे, ही त्यांची भूमिका असते, असा आरोपही त्यांनी प्रणिती शिंदेंवर केला.

राम सातपुते म्हणाले, बदलापूरसारख्या घटनेचा निषेध झाला पाहिजे. असे कृत्य करणाऱ्या सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. सरकारने कारवाई केलेली असून आरोपीला अटकही करण्यात आलेले आहे. फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला चालवला जाणार आहे. मला विश्वास आहे की, ज्यांनी हे कृत्य केले आहे, त्यांना फासावर लटकवल्याशिवाय सरकार शांत बसणार नाही.

Ram Satpute-Praniti shinde
Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटलांनी संयम राखावा; पवारांच्या भेटीनंतर भाजप नेत्याचा सबुरीचा सल्ला

सोलापूरकरांना चांगली दहीहंडी उत्सव साजरी करण्याची संधी दिल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन करतो. दहीहंडी हा सर्व समाजाचा एकोपा दाखवणारा आणि एकत्र आणणारा सण आहे, असेही सातपुते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com