Mohite Patil Vs Satpute : गावठी चाणक्य म्हणत सातपुतेंचा जयसिंह मोहिते पाटलांवर हल्लाबोल; म्हणाले, ‘इथली जनता दुधखुळी नाही...’

Malshirash Political News : दिवाळी मिलन कार्यक्रमात भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांनी जयसिंह मोहिते पाटील यांच्यावर टीका करत त्यांना ‘गावठी चाणक्य’ असे संबोधले. जयसिंह यांनी रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या समर्थनाची घोषणा केली होती.
Ram Satpute-Jaysingh Mohite Patil
Ram Satpute-Jaysingh Mohite Patil Sarkarnama
Published on
Updated on
  1. सहकार महर्षी कार्यक्रमात जयसिंह मोहिते पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हेतू रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे जाहीर केले.

  2. माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांनी जयसिंहांचा कटू प्रत्युत्तर दिले — त्यांना “गावठी चाणक्य” म्हणत त्यांच्या बदलत्या भूमिकेवर निशाणा साधला आणि पक्षप्रवेशांवर टिका केली.

  3. सातपुते यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे कार्यकर्त्यांबद्दलचे समर्थन आणि देवेंद्र फडणवीस यांचे पाठबळ याचा उल्लेख केला.

Solapur, 26 October : सहकार महर्षी साखर कारखान्याच्या गाळप हंगामाच्या कार्यक्रमात बोलताना जयसिंह मोहिते पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यासाेबत राहणार असल्याचे विधान केले होते. त्याचा भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांनी दिवाळी मिलन कार्यक्रमात खरपूस शब्दांत समाचार घेताना जयसिंह मोहिते पाटील यांचा उल्लेख गावठी चाणक्य असा करत त्यांच्यावर निशाणा साधला.

राम सातपुते म्हणाले, जयकुमार गोरेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून माळशिरस तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपत प्रवेश केला. अनेक मोठंमोठे नेते रांगेत आहेत, त्यामुळे अकलूजचे गावठी चाणक्य म्हणाले, लोकसभेला आम्ही धैर्यशील मोहिते पाटलांसोबत होतो. आता आम्ही रणजितसिंह मोहिते पाटलांसोबत आहोत. हा ढोंगीपण समजणार नाही, इतकी इथली जनता दुधखुळी नाही.

उत्तम जानकरांना आमदार करण्याचा शब्द दिला होता. तुम्ही अपक्ष किंवा तुतारीवर लढा. पण, कमळ घ्यायचं नाही, असे जयसिंह मोहिते पाटील म्हणाले होते. आता म्हणतात कमळावर लढलं तर चालतयं. पण, असं चालत नाही. लोकसभा निवडणुकीच्या वेळी ते म्हणाले होते की, कोण देवेंद्र फडणवीस त्यांना आम्ही ओळखत नाही. पण त्याच फडणवीसांच्या पायापाशी जाण्याचे वेळ इथला कार्यकर्त्यांनी तुमच्यावर आणली, असा टोला सातपुते यांनी मोहिते पाटील यांना लगावला.

मागच्या पाच वर्षांत आपण दोन कोटींच्या आत काम टाकलेले एकही गाव नाही. आपल्या सोलापूर जिल्ह्याला न्याय देणारा एक नेता भेटला. पालकमंत्री म्हणून जयकुमार गोरे हे आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. कार्यकर्त्याच्या पाठीशी नेता कसा असतो, याचे उदाहारण माझ्या सात वर्षांच्या राजकीय आयुष्यात कुठलं पाहिलं असेल तर ते गोरे आहेत, असेही सातपुते यांनी नमूद केले.

ते म्हणाले, जयकुमार गोरे हे कार्यकर्त्यांच्या पाठीशी ताकदीने उभे राहतात, ते मॅनेज होत नाहीत; म्हणून ते पालकमंत्री नको म्हणून अकलूजच्या नदीकाठी कोणीतरी बाबा आणून बाहुल्या जाळण्याचे काम केले होते. पण, सोलापूरच्या प्रस्थापित नेत्यांना मॅनेज न होणारा कोण असेल तर ते गोरे आहेत, हे देवेंद्र फडणवीस यांनी ओळखले.

Ram Satpute-Jaysingh Mohite Patil
Ram Satpute : विधानसभा मतदानाच्या दोन दिवस आधी फडणवीसांनी रणजितसिंह मोहिते पाटलांना फोन केला होता; राम सातपुतेंनी सांगितली इनसाईड स्टोरी

लोकसभा निवडणुकीत माझा पराभव झाला. काही कारणास्तव मी लोकसभेनंतर मागं पडलो. आयुष्यातील तो माझा पहिलाच पराभव होता. राजकारणात कमी वयात आलो. कॉलेज जीवनात जीएसचीसुद्धा निवडणूक कधी हरलो नाही. त्यामुळे थोडं दुःख झालं. आपलेही काही लोक लोकसभेला गद्दार निघाले, त्यामुळे थोडंसं खचलो होतो, असेही सातपुते यांनी सांगितले.

ते म्हणाले, मला देवेंद्र फडणवीस यांनी बोलावून घेऊन सांगितले की, राम तुझं वय कमी आहे. ज्या वयात लोकांची राजकारणाची सुरुवात होते, त्या वयात तू आमदार झाला आहे. त्यामुळे पराभवाने तू खचून जाऊ नको. जोपर्यंत श्वासात श्वास आहे, तोपर्यंत मी तुझ्यासाख्या कार्यकर्त्याच्या पाठीशी ताकदीने उभे राहीन, असा शब्द मला देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

देवेंद्र फडणवीस यांनी मला सागर बंगल्यावर बोलावून घेऊन सांगितलं की, राम तुला माळशिरस विधानसभेची निवडणूक लढवायची आहे. आम्ही माळशिरसमध्ये सात सर्व्हे केले आहेत, त्या सातही सर्व्हेत सातपुते सोडता दुसरा पर्याय दिसत नाही, त्यामुळे तुला लढायचं आहे. मी भाऊंचे आशीर्वाद घेतले. माळशिरस तालुक्याच्या सीमेवर हजारो कार्यकर्त्यांनी माझे स्वागत केले, असेही राम सातपुते यांनी स्पष्ट केले.

Ram Satpute-Jaysingh Mohite Patil
Rajan Patil : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी माजी आमदार राजन पाटलांनी तातडीने गाठले फलटण; फलटण दौऱ्याची चर्चा!

त्यांनी बीपी आणि शुगरच्या गोळ्या खायला सुरुवात केली होती....

माजी आमदार सातपुते म्हणाले, मला मतदान केले का, असं मी कधी कोणालाही विचारलं नाही. सर्वसामान्यांची काम केली. पण, राम सातपुतेला पाच हजारांत गुंडाळू, असे विरोधी लोक म्हणत होते. पण एकोणीसाव्या फेरीपर्यंत ह्या लोकांनी बीपी आणि शुगरच्या गोळ्या खायला सुरुवात केली होती. हे माळशिरस तालुक्यातील बहाद्दर कार्यकर्त्यांच्या जीवावर करू शकलो.

Q1 — जयसिंह मोहिते पाटीलने काय म्हटलं?
त्यांनी आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये रणजितसिंह मोहिते पाटीलांच्या पाठीशी राहण्याची भूमिका व्यक्त केली.

Q2 — राम सातपुतेंनी काय मुद्दे उठवले?
सातपुतेंनी जयसिंहांच्या बदलत्या भूमिका आणि पक्षप्रवेशावरील ढोंगीपणावर टीका केली.

Q3 — जयकुमार गोरे यांचा काय उल्लेख केला गेला?
सातपुते म्हणाले की जयकुमार गोरे हे कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणारे नेते आहेत आणि ते लोकल विकासात महत्त्वाचे योगदान देतात.

Q4 — या वादाचा स्थानिक राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो?
यामुळे माळशिरसमधील गट-प्रवेश आणि नेत्यांमधील नातेसंबंध अधिक तापतील आणि स्थानिक निवडणूक रणनीतींवर परिणाम होऊ शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com