Malshiras Politic's : माळशिरसमध्ये भाजप उमेदवार निवडीचे अधिकार राम सातपुतेंना; गोरेंच्या घोषणेमुळे मोहिते पाटलांच्या भूमिकेकडे लक्ष

Local Body Election 2025 : नातेपुते येथे झालेल्या दिवाळी मिलन कार्यक्रमात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जाहीर केले की माळशिरस तालुक्यातील भाजप उमेदवार निवडीचे अधिकार माजी आमदार राम सातपुते यांच्याकडे असतील.
Jaykumar Gore-Ram Satpute
Jaykumar Gore-Ram SatputeSarkarnama
Published on
Updated on
  1. माजी आमदार राम सातपुते यांनी दिवाळी मिलन कार्यक्रमात मोहिते पाटलांवर जोरदार टीका करत माळशिरस तालुक्यातील भाजप उमेदवार निवडीचे अधिकार स्वतःकडे असल्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले.

  2. सातपुते यांनी मोहिते पाटलांच्या सहकारी संस्थांतील गैरव्यवहारांच्या चौकशीची मागणी करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आणि धरणे आंदोलन करण्याची घोषणा केली.

  3. भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवणार असून, मोहिते पाटलांसोबत कोणत्याही परिस्थितीत जाणार नाही, असे सातपुते यांनी स्पष्ट केले.

Natepute, 27 October : माळशिरस तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांसाठी माजी आमदार राम सातपुते यांच्या वतीने नातेपुते येथे दिवाळी मिलन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमात सातपुते यांनी मोहिते पाटलांवर कडाडून हल्ला चढवला. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात भाष्य करताना ‘माळशिरस तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार निवडीचे संपूर्ण अधिकार हे माजी आमदार राम सातपुते यांच्याकडे दिले आहेत’, अशी माहिती दिली. त्यामुळे आता मोहिते पाटलांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे.

नातेपुते येथील दिवाळी मिलन कार्यक्रमास तालुक्यातील हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. त्या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना माजी आमदार राम सातपुते (Ram Satpute) म्हणाले ‘माळशिरस तालुक्यातील मोहिते पाटील समर्थक मोठ्या संस्थांचे पदाधिकारी भाजपमध्ये येणार आहेत, त्याची माहिती होताच मोहिते पाटलांनी आम्हीच भाजपचे काम करणार आहोत, अशी हुल उडवल्यामुळे कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत. जेणेकरून तालुक्यातील त्यांचे बस्तान सुरक्षित रहावे, हा त्यांचा हेतू आहे.

माळशिरस तालुक्यातील मोहिते पाटलांच्या वर्चस्वाखालील सर्व सहकारी संस्थांमधील गैरव्यवहाराची चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करणार आहोत. अकलूज येथील सुमित्रा पतसंस्थेत गैरव्यवहार आहे. या संस्थेच्या संचालकावर कारवाई व्हावी, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा व धरणे आंदोलन करणार आहोत, असेही सातपुते यांनी स्पष्ट केले.

आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्ष कोणत्याही परिस्थितीत मोहिते पाटलांसोबत जाणार नाही. कार्यकर्त्यांनी संभ्रमावस्थेत‌ राहू नये, असे आवाहन करून माजी आमदार राम सातपुते म्हणाले, माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या नऊ, पंचायत समितीच्या १८ जागा, तसेच अकलूज नगरपरिषदेची निवडणूक भाजप स्वबळावर लढवणार आहे. भाजपची एकहाती सत्ता स्थानिक स्वराज्य संस्थेत येणार आहे. हे सर्व कार्यकर्त्यांच्या बळावर करणार आहोत.

सोलापूर जिल्ह्यात ऑपरेशन लोटस ही प्रक्रिया सुरूच राहणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे माळशिरस तालुक्यातील कार्यकर्त्यांनी पक्षासोबत ठामपणे उभे राहावे, असे आवाहनही या मेळाव्यातून करण्यात आले आहे. दरम्यान, माळशिरसमधील भाजप उमेदवार निवडीचे अधिकार राम सातपुते यांना दिल्याने मोहिते पाटील यांची भूमिका काय असणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे.

दरम्यान, आमदार उत्तम जानकर आणि मोहिते पाटील हे एकत्र येऊन आगामी निवडणुका लढवणार आहेत. मात्र, हे दोघे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविणार की आघाडी करून लढणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

1. माळशिरस तालुक्यात भाजप उमेदवार निवडीचे अधिकार कोणाकडे दिले आहेत?
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी हे अधिकार माजी आमदार राम सातपुते यांना दिले आहेत.

2. राम सातपुते यांनी मोहिते पाटलांविरोधात काय भूमिका घेतली?
त्यांनी मोहिते पाटलांच्या संस्थांतील गैरव्यवहारांची चौकशी व कारवाईची मागणी केली आहे.

3. आगामी निवडणुका भाजप कशा लढवणार आहे?
भाजप माळशिरस तालुक्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढवणार आहे.

4. मोहिते पाटलांची भूमिका आता कशी असणार आहे?
उमेदवार निवडीचे अधिकार सातपुते यांना मिळाल्याने मोहिते पाटलांची पुढील राजकीय भूमिका उत्सुकतेचा विषय बनली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com