Ram Shinde : ठाकरे सरकारमुळेच टाटा-एअरबस प्रकल्पाचा महाराष्ट्राला 'टाटा' !

महाराष्ट्रातील टाटा-एअरबस हा टाटा उद्योग समुहाचा महत्त्वाचा प्रकल्प गुजरातला गेला आहे.
Vidhan Parishad | BJP| Ram Shinde|
Vidhan Parishad | BJP| Ram Shinde| Sarkarnama
Published on
Updated on

Ram Shinde : महाराष्ट्रातील टाटा-एअरबस हा टाटा उद्योग समुहाचा महत्त्वाचा प्रकल्प गुजरातला गेला आहे. यावरून महाविकास आघाडीतील नेत्यांनी शिंदे-भाजप सरकारवर जोरदार टीका केली. या टीकेला भाजपचे आमदार राम शिंदे ( Ram Shinde ) यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले आहे.

राम शिंदे म्हणाले, सुमारे वर्षभरापूर्वीच गुजरातेत गेलेल्या एअरबस प्रकल्पावरून टीका करणे म्हणजे महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या जनतेशी केलेले पाप लपविण्याचा प्रकार आहे, अशी टीका शिंदे यांनी केली आहे. ठाकरे सरकारने महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्राचे वाटोळे करून आता उलटा कांगावा सुरू केला आहे, असा आरोपही त्यांनी केला.

Vidhan Parishad | BJP| Ram Shinde|
Ram Shinde : मी अडीच वर्षातच पुन्हा आलो..

ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतील मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत संपूर्ण देशांतर्गत विमान निर्मितीच्या या प्रकल्पासाठी 8 सप्टेंबर 2021 रोजी मे. एअर बस आणि स्पेस एसए स्पेन यांच्यातील कराराला मंत्रिमंडळ सुरक्षा समितीने मान्यता दिली आणि लगेच 24 सप्टेंबर 2021 रोजी संरक्षण मंत्रालयासोबत सामंजस्य करार करण्यात आला. एअरबस आणि टाटा यांच्यातील करारानुसार संयुक्तपणे उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पास संरक्षण मंत्रालयाने हिरवा कंदील दाखविल्याचे रतन टाटा यांनी त्याच दिवशी जाहीरही केले. असे असताना सुद्धा हा प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी एकही पत्र तत्कालिन महाविकास आघाडी सरकारने पाठविले नाही वा कोणता पाठपुरावा केला नाही.

Vidhan Parishad | BJP| Ram Shinde|
Ram Shinde : गांधी टोपी घालून राम शिंदेंची बुलेटवरून तिरंगा रॅली

या वस्तुस्थितीची माहिती असताना निव्वळ दिशाभूल करण्याचे राजकारण आता तरी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी करु नये. मुद्यांवर बोलायचे असल्यास टाटा एअरबसला लिहिलेले एकतरी पत्र त्यांनी जाहीर करावे, असे आव्हान आमदार राम शिंदे यांनी दिले आहे. वेदान्ता-फॉक्सकॉन प्रकल्पाबाबतही ठाकरे सरकारने असाच बेजबाबदारपणा दाखवून तो प्रकल्प घालविला. या प्रकल्पातूनही वाटाघाटीद्वारे वसुलीचा छुपा हेतू तर नव्हता ना, अशी शंकाही आमदार शिंदे यांनी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com