Nagar Politics : राम शिंदे दूर करणार शेतकऱ्यांची नाराजी; मुख्यमंत्र्यांसोबत 'या' विषयांवर चर्चा...

Karjat- Jamkhed Politics : जामखेड तालुक्यातील समस्यांवर चर्चा करण्यासाठी आ. राम शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
 Ram Shinde
Ram ShindeSarkarnama
Published on
Updated on

Nagar Politics : दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये कर्जत-जामखेडमधील जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. मतदारसंघांमध्ये कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासन भाजप आमदार राम शिंदे यांनी दिले आहे. जामखेड तालुक्यामध्ये चारा छावण्या, पाण्याचे टँकर, पीकविमा यासंदर्भात चर्चा करण्यासाठी आ. राम शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी त्यांच्या भागातील शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदनही दिले.

अतिवृष्टीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले. दरम्यान, याच काळात उन्हाळी अधिवेशनात विरोधकांनी सभागृहात विरोधकांनी जोरदार मागणी केल्याने मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्विंटल 350 रुपये अनुदान घोषित केले. मात्र, राज्यातील विशेष करून नगर, नाशिक, पुणे या भागातील अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात अजून हे अनुदान जमा न झालेले नाही. त्यामुळे विरोधकांनी अनेकदा सरकारवर टीकेचे आसूड ओढले.

 Ram Shinde
JDS Join NDA : कर्नाटकात पराभूत झालेल्या BJPच्या रथाला JDSचे चाक; 'फॅमिली प्रायव्हेट पार्टी' म्हणून मोदींनी हिणवलेला पक्ष NDA मध्ये सहभागी

जामखेड तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अनुदानासाठी भाजप आ. राम शिंदे यांच्यासह जामखेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पणनमंत्री अब्दुल सत्तार यांची भेट घेतली. जामखेड तालुक्यात कांदा उत्पादक अनुदानात जे 3500 शेतकरी वंचित आहेत. अशा शेतकऱ्यांना तातडीने कांदा अनुदान मिळावं, यासाठी त्यांना सर्व वस्तुस्थिती समजावून सांगून कांदा अनुदानात आपण स्वतः लक्ष देऊन जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी केली.

पण, आता अनुदान न मिळालेल्या शेतकऱ्यांनी सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. पण या नाराजीचा फटका आपल्याला बसू नये म्हणून सत्ताधारी पक्षाचे आमदारही सरसावले आहेत. मुख्यमंत्री, पणनमंत्री यांना निवेदने देऊन राहिलेल्या शेतकऱ्यांचे अनुदान त्वरित जमा करण्यासाठी दबाव वाढवत आहेत.

राम शिंदे यांच्या मागणीला प्रतिसाद देत मंत्री अब्दुल सत्तार यांनी तातडीने पणन उपसंचालक, अहमदनगर जिल्हाधिकारी यांना आदेश देऊन जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांवर कुठलाही अन्याय होणार नाही, याची काळजी घेऊन कांदा अनुदानात अपात्र झालेल्या शेतकऱ्यांच्या अर्जाची तपासणी करावी, असे आदेश दिले.

Edited By- Anuradha Dhawade

 Ram Shinde
Ahmednagar Politics : पालकमंत्री आहात मालकासारखे वागू नका... ; थोरातांचे विखेंना खडे बोल !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com