रामदास आठवले म्हणाले, कोल्हेंनी माझ्या लग्नात लाडू वाटले होते...

आरपीआय (आठवले गट)चे नेते तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले ( Ramdas Athavale ) यांनी कोल्हे कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले.
Ramdas Athawale News, Ramdas Athawale Shankarrao Kolhe News
Ramdas Athawale News, Ramdas Athawale Shankarrao Kolhe NewsSarkarnama
Published on
Updated on

कोपरगाव ( जि. अहमदनगर ) - माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे दोन दिवसांपूर्वी निधन झाले. आरपीआय (आठवले गट)चे नेते तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले ( Ramdas Athavale ) यांनी कोल्हे कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. या प्रसंगी रामदास आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या स्मृतींना उजाळा दिला. ( Ramdas Athavale said, Kolhe had felt laddu in my marriage ... )

केंद्रीय मंत्री रामदास आठवले कोपरगाव येथे स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांच्या घरी जाऊन सात्वन केलं यावेळी जुन्या आठवणींना उजाळा दिल. रामदास आठवले म्हणाले, माझ्या लग्नामध्ये स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांनी लाडू वाटले होते, असे आठवले यांनी सांगितले. (Ramdas Athawale News)

Ramdas Athawale News, Ramdas Athawale Shankarrao Kolhe News
Video : राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यावर रामदास आठवले म्हणतात....

आठवले यांनी सांगितले की, माजी मंत्री शंकरराव कोल्हे हे सहकारासह विविध क्षेत्रातील आदरनिय व्यक्तिमत्त्व होते. त्या काळामध्ये शंकरराव कोल्हे यांनी अमेरिकेमध्ये शिक्षण घेतल्यानंतर अमेरिकेमध्ये न राहता आपल्या देशात येऊन शेतकऱ्यांसाठी काम केलं. माझा आणि त्यांचा अगदी घरोबा होता. त्यांनी माझ्या लग्नाच्या वेळी लाडू वाटले होते. त्यांनी मला आग्रह केला होता की तुमचे लग्न आमच्याकडे कोपरगावला करा. ते हसतमुख व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या विषयी आमच्या मनात आदर होता. सुरवातीला त्यांंनी सिंह चिन्ह घेऊन निवडणूक लढविली. ते सिंहा सारखे व्यक्तिमत्त्व होते. शंकरराव कोल्हे होतं त्यांचं नाव अन् त्यांचं होत कोपरगाव, अशी रामदास आठवले यांनी कविताही केली.

Ramdas Athawale News, Ramdas Athawale Shankarrao Kolhe News
रामदास आठवले म्हणतात; शिवसेनेला मुंबईत हरवणे अवघड नाही...

शंकरराव कोल्हे यांच्या निधनामुळे विविध राजकीय नेते कोल्हे कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी येत आहेत. रामदास आठवले यांचा हा एकाच महिन्यातील तिसरा दौरा आहे. त्यामुळे रामदास आठवले शिर्डी मतदार संघात पुन्हा सक्रिय होत असल्याची चर्चा सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com