Phaltan Political News : रामदास आठवले म्हणाले, या कारणांमुळे मी केंद्रीय मंत्रीपदापर्यंत पोहचू शकलो...

Ramdas Athawale फलटण येथील दलित पँथरचे सदस्य शंकर पवार यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित शोकसभेत श्री. आठवले बोलत होते.
RPI Leader Ramdas Athawale
RPI Leader Ramdas Athawalesarkarnama

-किरण बोळे

Phaltan Political News : दलित पँथरच्या चळवळीपासुन येथील समाज बांधव व तरुणांची सदोदीतपणे आपणास सक्रिय साथ लाभली आहे. महाराष्ट्राच्या आंबेडकरी चळवळीत फलटण महत्वपुर्ण केंद्रबिंदू राहिले आहे. आपल्या आजवरच्या वाटचालीमध्ये सर्वांची साथ लाभल्यानेच आपण केंद्रिय मंत्रीपदापर्यंत पोहचू शकलो, असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

भारतीय दलित पँथरचे फलटण Phaltan येथील सदस्य शंकर पवार यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर फलटण येथील मंगळवार पेठेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृतीभवन येथे पवार यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित शोकसभेत श्री. आठवले Ramdas Athawale बोलत होते.

कालकथित शंकर पवार सारखे विविध समाजातील निष्ठावान कार्यकर्त्यांची फळी उभी राहिल्याने पँथरचा झंझावात महाराष्ट्रासह अन्य राज्यात पोहोचल्याचे निदर्शनास आणून देत श्री. आठवले म्हणाले, ऐंशी व नव्वदच्या दशकात आपण अनेकदा फलटण येथे कार्यक्रमांच्या निमित्ताने आलो आहे.

केंद्रीय मंत्रीपदाच्या माध्यमातून आपणास लक्षावधी व्यक्ती अन् संस्थांची कामे करता आली. समाज प्रचंड मोठा असल्याने आणि देशभर रिपब्लिकन चळवळ विस्तारल्यामुळे सर्वच ठिकाणी पोहोचता येत नाही. तथापि, सामुदायिक पातळीवरील कोणतेही काम असले अन कार्यकर्त्यांनी, तरुणांनी चिकाटीने पाठपुरावा केला तर नक्की मोठी कामे उभी राहतील.

Edited By Umesh Bambare

RPI Leader Ramdas Athawale
RPI-BJP News : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतही 'आरपीआय'ची भाजपशी युती, पण फायदा किती?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com