रामराजेंना माढ्यातून लोकसभा निवडणूक लढावी लागणार... नेत्यांनीच दिले संकेत

Ramraje Nimbalkar यांची विधान परिषदेची मुदत येत्या जुलैमध्ये संपत आहे.
रामराजेंना माढ्यातून लोकसभा निवडणूक लढावी लागणार... नेत्यांनीच दिले संकेत

पुणे : विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर (Ramraje Nimbalkar) यांची विधान परिषद सदस्यत्वाची मुदत येत्या जुलैमध्ये संपत आहे. त्यांना पुन्हा ज्येष्ठांच्या सभागृहात येण्याची संधी मिळणार असल्याचे सांगण्यात येत असले तरी त्यांना 2024 मध्ये माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

विधान परिषदेतील 10 आमदार येत्या जुलैमध्ये निवृत्त होत आहेत. त्यात राष्ट्रवादीचे निंबाळकर आणि संजय दौंड यांचा समावेश आहे. याशिवाय भाजपचे प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, सदाभाऊ खोत, सुजितसिंह ठाकूर आणि विनायक मेटे हे पण निवृत्त होत आहेत. शिवसेनेकडून सुभाष देसाई, दिवाकर रावते आणि रवींद्र फाटक यांची सहा वर्षांची मुदत संपत आहे.

रामराजेंना माढ्यातून लोकसभा निवडणूक लढावी लागणार... नेत्यांनीच दिले संकेत
संग्राम थोपटे यांची प्रतिक्षा संपेना.. अडीच वर्षे पदाची वाट पाहण्यातच!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या सदस्यांना निरोप देताना भाषण केले होते. रामराजे यांनी पुन्हा या सभागृहात यावे, असे वाटते. पण तुम्ही देशाच्या संसदेत काम करावी, अशी इच्छा आहे, अशा सूचक शब्दांत आपले मत मांडले. याचा अर्थ रामराजे हे पुन्हा विधान परिषदेवर येण्याची चिन्हे आहेत. मात्र त्यांना 2024 ची लोकसभा निवडणूक लढवावी लागणार असल्याचे आताच सांगण्यात येत आहे.

रामराजे हे माढ्यातून खराखरीच लढल्यास तेथे दोन निंबाळकरांमध्ये सामाना होईल. रामराजे विरुद्ध भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर अशी ती लढत होऊ शकते. ही दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील निवडणूक ठरेल. कारण फलटण तालुक्याच्या राजकारणात हे दोन्ही गट गेली अनेक वर्षे एकमेकांच्या विरोधात आहेत.

विधान परिषदेतील निरोप समारंभात बोलताना सदाभाऊ खोत यांनी या प्रसंगी रामराजेंना सल्ला दिला होता. कारण सदाभाऊंनी स्वतः 2014 मध्ये माढा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. सदाभाऊंच्या म्हणण्यानुसार कुठं तिकडे माढ्यात लढायला जाता? तिथलं वातावरण कधीपण बदलू शकते. उलट तुम्ही विधान परिषदेतच परत. तुम्हीच विधान परिषदचे पुन्हा सभापती व्हा. सदाभाऊंचा हा सल्ला रामराजे किती मनावर घेतात हे पाहायला हवे.

रामराजेंना माढ्यातून लोकसभा निवडणूक लढावी लागणार... नेत्यांनीच दिले संकेत
मंत्र्यांना अडचणीत कोण आणते..गडकरींनी सांगितली ही तीन नावे..

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विश्वासातील म्हणून रामराजे यांची ओळख आहे. त्यामुळे पवार हे त्यांच्याबाबतीत काय निर्णय घेणार याची उत्सुकता पुढील काळात आहे. माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद आहे. तरी 2019 मध्ये पराभव झाला होता. ज्येष्ठ नेत्यांना दिल्लीला पाठविण्याचेही पक्षाचे नियोजन असू शकते. अर्थात या पुढील दोन वर्षांतील बाबी आहेत. रामराजे हे 2024 पर्यंत तरी सभापती निश्चित राहणार असल्याचे त्यांच्या पक्षात सांगण्यात येते. रामराजेंना 2019 मध्येच खासदारकीचे वेध लागले होते. राष्ट्रवादीचे तत्कालीन खासदार उदयनराजे हे पक्षाच्या विरोधात होते. तेव्हाच उदयनराजेंचे तिकिट कापून रामराजेंना सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू होत्या. पण उदयनराजेंनाच राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. पण सहा महिन्यांतच त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. साताऱ्यात पोटनिवडणूक झाली. तेथे राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी भाजपकडून निवडणूक लढवत असलेल्या उदयनराजे यांचा पराभव केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com