Satara Political News : जिल्हा बॅंकेच्या सभेत रामराजे, उदयनराजे रमले हास्यविनोदात...

Satara DCC Bank Meeting सातारा जिल्हा बॅंकेची वार्षिक सर्वसाधारण सभेत ज्येष्ठ संचालक रामराजे नाईक निंबाळकर व खासदार उदयनराजे भोसले हे दोघे एकमेकांच्या शेजारी बसले होते.
Ramraje Naik Nimbalkar, Udayanraje Bhosale
Ramraje Naik Nimbalkar, Udayanraje BhosaleSarkarnama
Published on
Updated on

Satara Political News : सातारा जिल्हा बॅंकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आपला जुना वाद विसरत माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर व खासदार उदयनराजे भोसले एकमेकांच्या शेजारी बसून हास्यविनोदात रमले होते. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या, तर काहींचे चेहरे पडले होते. फलटण आणि सातारच्या राजांमध्ये दिलजमाई कधी झाली, असा प्रश्न सर्वांच्या चेहऱ्यावर जाणवत होता.

सातारा जिल्ह्यात आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार Sharad Pawar यांची दहिवडीत सभा होत. कोल्हापूरकडे जाताना श्री. पवार यांनी माण तालुक्यातील दुष्काळी जनतेची विचारपूस करण्याच्या निमित्ताने कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपसह महायुतीतील BJP घटक पक्षांतील नेत्यांवर टीकेची झोड उठवली.

सकाळी ते बारामतीहून दहिवडीकडे जाताना श्री. पवार फलटणमध्ये थांबले. येथे त्यांचे राष्ट्रवादीच्यावतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यांच्या स्वागतासाठी आमदार शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना आमदार शशिकांत शिंदेंनी रामराजे नाईक निंबाळकर व खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना डिवचले.

परिवर्तनाची सुरवात फलटणमधून होणार असल्याचे सांगत त्यांनी दोन्ही निंबाळकरांना आव्हान दिले. याची चर्चा सुरु असतानाच आज दुपारी सातारा जिल्हा बॅंकेची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. या सभेत व्यासपीठावर ज्येष्ठ संचालक रामराजे नाईक निंबाळकर व खासदार उदयनराजे भोसले हे दोघे एकमेकांच्या शेजारी बसून हास्यविनोदात रमले होते. त्यामुळे अनेकंच्या भुवया उंचावल्या गेल्या.

Ramraje Naik Nimbalkar, Udayanraje Bhosale
Satara NCP News : मित्र पक्षांनी शरद पवारांबाबत जपून वक्तव्ये करावीत : शशिकांत शिंदेंचा राऊतांना इशारा

या दोघांतील वाद आणि त्यातून त्यांनी एकमेकांना शासकिय विश्रामगृहात दिलेले आव्हान संपूर्ण जिल्ह्याला माहित आहे. पण, आता हा वाद मिटला असून या दोघांत दिलजमाई झाली हेच यातून सर्वांना जाणवले. यातून आगामी राजकारणात जिल्ह्यात कोणते फुल उमलणार याची उत्सुकता सातारकरांना आहे.

Edited By Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com