शिवेंद्रसिंहराजे आणि शशिकांत शिंदे यांच्या वादात रामराजेंची मध्यस्थी...

जिल्हा बँकेसंदर्भातील या बैठकीत बँकेची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याचा निर्णय झाला आहे. ही निवडणूक पक्ष बाजूला ठेऊन बिनविरोध करण्याकडे सर्वांच्या चर्चेचा कल राहिला आहे.
Shivendraraje, Ramraje Nimbalkar, shashikant shinde
Shivendraraje, Ramraje Nimbalkar, shashikant shindesarkarnama
Published on
Updated on

सातारा : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी अद्याप राजकिय पातळीवरून कोणतीच हालचाल झालेली नाही. पण मुंबईत काल विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची प्राथमिक बैठक झाली. यामध्ये शिवेंद्रसिंहराजेंना सोबत घेऊन निवडणूक बिनविरोध करण्याबाबत चर्चा झाली. तसेच आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व शशीकांत शिंदें यांच्यात सातारा- जावळीवरून सुरू असलेला वाद शांत करण्याचा प्रयत्न सभापती रामराजे यांनी केल्याचे सांगितले जात आहे.

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणूकीसाठी अंतिम मतदारयादी तयार आहे. पण कच्च्या यादीतील खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे यांचे पाणीपुरवठा मतदारसंघातून पात्र ठरलेल्या ठरावांविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. त्यामुळे यावर न्यायालयाचा निर्णय होत नाही, तोपर्यंत यादी प्रसिध्द करू नयेत, अशी सूचना न्यायालयाने केल्याने अंतिम मतदार यादी लटकली आहे.

Shivendraraje, Ramraje Nimbalkar, shashikant shinde
रामराजे, बाळासाहेब पाटील भाजपच्या नेत्यांना चुचकारणार...

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून अद्याप कोणतीही बैठक घेतलेली नाही. अंतिम मतदार यादी प्रसिध्द झाल्यानंतरच प्रमुख नेत्यांची बैठक होऊन आगामी रणनिती ठरविली जाणार होती. मात्र, रिझर्व्ह बँक व नाबार्डची नवीन नियमावली संदर्भात नेमकी काय भूमिका घ्यायची तसेच इतर मतदारसंघातील विषयासंदर्भात चर्चा करण्यासाठी काल मुंबईत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची प्राथमिक बैठक झाली. या बैठकीला पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शशीकांत शिंदे, मकरंद पाटील, भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले उपस्थित होते.

Shivendraraje, Ramraje Nimbalkar, shashikant shinde
साताऱ्याची हद्दवाढ अजित पवारांच्या सहकार्यानेच मार्गी : शिवेंद्रसिंहराजे

बैठकीत जिल्हा बँकेच्या निवडणूकीविषयी चर्चा झाली. यामध्ये शिवेंद्रसिंहराजेंना सोबत घेऊनच निवडणूक लढण्याचा निर्णय झाला. तसेच राखीव व संस्था मतदारसंघाविषयीही चर्चा झाली. यामध्ये कोणाला कोणते मतदारसंघ हवे आहेत, याविषयी मते जाणून घेण्यात आली. या बैठकीत जावळी सोसायटी मतदारसंघावरून शिवेंद्रसिंहराजे भोसले समर्थक व आमदार शशीकांत शिंदे यांच्यात सुरू असलेला वादावर विशेष चर्चा झाली. यामध्ये सभापती रामराजेंनी मध्यस्ती करत शिवेंद्रसिंहराजे व शशीकांत शिंदे यांच्यातील वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. दोघांनाही शांत करत दोघांनी एकमेकांना सहकार्य करण्याविषयी सूचना केल्याचे समजते.

सभापती रामराजेंच्या निवासस्थानी झालेली जिल्हा बँकेसंदर्भातील या बैठकीत बँकेची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याचा निर्णय झाला आहे. ही निवडणूक पक्ष बाजूला ठेऊन बिनविरोध करण्याकडे सर्वांच्या चर्चेचा कल राहिला आहे. त्यामुळे आता अंतिम यादी प्रसिध्द झाल्यानंतर दुसरी सर्व समावेश बैठक होणार आहे. त्यामध्ये अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

Shivendraraje, Ramraje Nimbalkar, shashikant shinde
वाद विसरले : शिवेंद्रसिंहराजे म्हणतात शशीकांत शिंदे आणि मी एकच....

आमच्यात कोणताही वाद नाही...

यासंदर्भात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व शशीकांत शिंदे यांच्याशी त्यांच्यातील सातारा-जावळी मतदारसंघावरून वाद आहे का, हे जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला. त्यावर दोघांनीही आमच्यात कोणताही वाद नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला या दोघांसह त्यांच्या समर्थकांतील कलगीतूरा कशासाठी होता, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com