Phaltan : रामराजेंचा 'हा' निर्णय धाडसी... शरद पवार

महाराष्ट्र Maharashtra एकसंघ कसा ठेवता येईल, यासाठी यशवंतराव चव्हाण Yashwantrao Chavan यांच्यासोबत श्रीमंत मालोजीराजे Malojiraje यांनी कामकाम केले होते. फलटणचा Phaltan इतिहास हा राज्यातील सामान्य माणसाच्या अंतःकरणात रूजलेला असा इतिहास History आहे, असेही श्री. पवार यांनी स्पष्ट केले.
Sharad Pawar, Ramraje Naik Nimbalkar
Sharad Pawar, Ramraje Naik Nimbalkarsarkarnama

सातारा : मालोजीराजे यांनी बारामती व फलटणमध्ये कारखाने उभारले आणि त्यामुळेच या भागाचा चेहरा बदलला. ही गोष्ट मान्यच करावी लागणार आहे. त्यानंतरच काळात राज्याच्या पाणीप्रश्नाचा ज्यांनी विचार केला, त्यामध्ये रामराजेंचे नाव आघाडीवर दिसते. दुष्काळी भागात पाणी गेलं पाहिजे, यासाठी रामराजेंनी विशेष प्रयत्न केले. राज्यात पाणी प्रश्नाबाबत जे अतिशय धाडसी निर्णय घेतले गेले, त्याचे शंभर टक्के श्रेय रामराजेंनाच आहे, असे स्पष्ट मत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले.

फलटण येथील अजिंक्य राजा या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात खासदार पवार बोलत होते. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, शशीकांत शिंदे, मकरंद पाटील, दीपक चव्हाण, संजीवराजे नाईक निंबाळकर, शिवरूपराजे खर्डेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

रामराजेंचे आगळेवेगळे व्यक्तीमत्व आहे. फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत असताना क्रिकेटचे उत्तम खेळाडू होते. जर त्यांच्या गुडघ्याला त्रास झाला नसता तर ते राष्ट्रीय क्रिकेटच्या सामान्य आपल्याला नक्कीच दिसले असते. त्यांनी लॉ कॉलेजचे प्राध्यापक व प्राचार्य म्हणून उत्तम असे कामकाज केले. वेगवेगळ्या क्षेत्रात आपले स्थान निर्माण करण्यात रामराजे यशस्वी झाले असून राज्य विधान परिषदेत त्यांन आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.

Sharad Pawar, Ramraje Naik Nimbalkar
रामराजे देशाच्या राजकारणात सक्रिय होणार; राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय समितीवर निवड

ज्या दिवशी विधान परिषदेचे सभागृह चालणार नाही, असे सर्वांना वाटत असायचे त्या दिवशी सुद्धा यशस्वीपणे सभागृह सुरू ठेवण्याचे कौशल्य रामराजेंकडे आहे. आता सध्या विधीमंडळाचा इतिहास लिहिण्याचे काम सुरू आहे. त्यामध्ये रामराजेंच्या सभापती पदाच्या यशस्वी कारकिर्दीचा उल्लेश केला जात आहे. सरकार दुसऱ्या विचारांचे, बहुमत दुसऱ्याचं अशा अवघड परिस्थितीत सुद्धा विधान परिषदेचे सभागृह चालविण्याचे काम रामराजेंनी केले.

Sharad Pawar, Ramraje Naik Nimbalkar
Video: राज्यात आणि देशात काही घडल तर पवार साहेबांवर टीका होते; रामराजे निंबाळक

रामराजेंच्या अमृत महोत्सवाचा मोठा सोहळा फलटणमध्ये आपण आयोजित करणार असून आज प्रकाशन झालेल्या रामराजेंच्या पुस्तकातून रामराजेंच्या आयुष्याचा काही भाग कळला आहे, असे सांगून श्री. पवार म्हणाले, फलटण हे महाराष्ट्राच्या इतिहासात महत्वाचा भाग आहे. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांपासून जर इतिहास पाहिला तर त्यामध्ये फलटणचा इतिहास बघायला मिळतो. तेव्हापासून ते आजपर्यंत राज्यात फलटणचे स्थान अबाधित आहे.

Sharad Pawar, Ramraje Naik Nimbalkar
देवेंद्र फडणवीस, अजितदादांची चर्चा; तर शरद पवार अन् नार्वेकरांचा एकाच गाडीतून प्रवास

छत्रपती शिवाजी महाराज यांचा त्या काळी आदर करणाऱ्या कोण व्यक्ती होत्या तर त्यामध्ये फलटणचे जावई म्हणून उल्लेख छत्रपतींच्या इतिहासात केला जातो. नाईक निंबाळकर घराण्याचा प्रचंड इतिहास आहे. फलटणच्या निंबाळकर यांचे गाव, नावं किंवा आडनाव हे निंबाळकर नव्हते. ते पवार होते. सामान्य माणसाच्या मनात ज्यांचं व्यक्तीमत्व आहे त्यांच नाव आजही आहे ते म्हणजे मालोजीराजे होय. स्वातंत्र्यानंतर मालोजीराजेंवर राज्यातील महत्वाच्या खात्याची जबाबदारी घेतली होती. त्या काळी मोठा संघर्ष होता.

Sharad Pawar, Ramraje Naik Nimbalkar
स्मार्ट सिटीचं स्वप्न दाखवून पुण्याचं वाटोळं केलं : अजित पवार भाजपवर बरसले

महाराष्ट्र एकसंघ कसा ठेवता येईल, यासाठी यशवंतराव चव्हाण यांच्यासोबत श्रीमंत मालोजीराजे यांनी कामकाम केले होते. फलटणचा इतिहास हा राज्यातील सामान्य माणसाच्या अंतःकरणात रूजलेला असा इतिहास आहे, असेही श्री. पवार यांनी स्पष्ट केले. त्यावेळी मालोजीराजे यांनी बारामती व फलटणमध्ये कारखाने उभारले आणि त्यामुळेच या भागाचा चेहरा बदलला. ही गोष्ट मान्य करावीच लागणार आहे. त्यानंतरच काळात राज्याच्या पाणी प्रश्नाचा ज्यांनी विचार केला, त्यामध्ये राज्यातील सर्व नेत्यांमध्ये रामराजेंचे नाव दिसत असते. दुष्काळी भागात पाणी गेलं पाहिजे, यासाठी रामराजेंनी विशेष प्रयत्न केलेले आहेत. राज्यात पाणी प्रश्नाबाबत जे अतिशय धाडशी निर्णय घेतले गेले, त्याचे शंभर टक्के श्रेय रामराजेंनाच आहे.

Sharad Pawar, Ramraje Naik Nimbalkar
सांगलीनंतर सातारा आरटीओतील हप्तेखोरीचा 'तो' व्हिडिओ व्हायरल....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com