Ajit Pawar, Sharad Pawar, Devendra Fadnavis, Milind Narvekar
Ajit Pawar, Sharad Pawar, Devendra Fadnavis, Milind Narvekarsarkarnama

देवेंद्र फडणवीस, अजितदादांची चर्चा; तर शरद पवार अन् नार्वेकरांचा एकाच गाडीतून प्रवास

एमसीए (MCA) निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील राजकारणी एकाच मंचावर आले आहेत
Published on

MCA Election : सध्या मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणुक चांगलीच गाजत आहे. निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील राजकारणी एकाच मंचावर आले आहेत. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पॅनलच्या बैठकीच्या निमित्ताने राजकीय विरोधक एकाच मंचावर आलेले पाह्यला मिळाले आहे.

या जाहीर कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी परस्परांशी गरवारे क्लबमध्ये चर्चा केली. ही चर्चा मते मिळवणे आणि फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेल्या अमोल काळे यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील विजयाबद्दल होती, की कसे याबाबत कमालीची उत्सुकता आहे.

Ajit Pawar, Sharad Pawar, Devendra Fadnavis, Milind Narvekar
कार्यक्रम सत्काराचा की निरोप समारंभाचा? पुण्याच्या माजी महापौरांना पडला प्रश्न...

दुसरीकडे एमसीए निवडणुकीतले उमेदवार आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर हे शरद पवार यांना निरोप देण्यासाठी त्यांच्या वाहनापर्यंत गेले. मग पवारसाहेबांनी त्यांना गाडीत बसवले. प्रवासादरम्यान या दोघांची काय चर्चा झाली याबद्दल प्रचंड कुतुहल आहे. नार्वेकरांना जिंकण्यासाठी काय काय करायला हवे, याची माहिती पवारांनी दिल्याची चर्चा आहे. या भेटीगाठीमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

दरम्यान, मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक गुरुवारी होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेल्या स्नेहभोजनासाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), शरद पवार (Sharad Pawar), जितेंद्र आव्हाड, मिलिंद नार्वेकर एकत्र आलेले होते. गेल्या चार महिन्यातील राजकीय घडामोडीनंतर पहिल्यांदाच हे नेते एकत्र दिसले. या निवडणुकीसाठी पवार आणि शेलार यांनी एकच पॅनल उभे केले आहे.

Ajit Pawar, Sharad Pawar, Devendra Fadnavis, Milind Narvekar
मुख्यमंत्री शिंदे, पवार, फडणवीस अन् नार्वेकर एकाच मंचावर; एमसीएत काय होणार

त्यांच्या विरोधात क्रिकेटपटू संदीप पाटील यांचे पॅनल निवडणूक लढवत आहे. फडणवीस यांचे निकटवर्तीय अमोल काळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिंगणात आहेत. एमसीएच्या अध्यक्षपदासाठी काळे आणि संदीप पाटील यांच्यात लढत होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com