Solapur Politics : मोहिते पाटील-परिचारक मैत्रीचे पुन्हा नवे पर्व; रणजितदादांचा पुढाकार...

Mohite Patil-Paricharak News : सोलापूर राजकारणाचा पट २००९ नंतर बदलत गेला. समविचारी आघाडीच्या माध्यमातून सोलापूरचे राजकारण सुरू झाले.
Ranjitsinh Mohite Patil-Prashant Paricharak
Ranjitsinh Mohite Patil-Prashant Paricharak Sarkarnama
Published on
Updated on

Solapur News : विधानसभेच्या २००९ च्या निवडणुकीपासून दुरावलेले सोलापूरच्या राजकारणातील बड्या घराण्यातील पुढची पिढी मागील सर्व काही विसरून एकत्र येताना दिसत आहे. पंढरपूरच्या रणांगणात २००९ च्या निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव झाल्यापासून माजी आमदार (स्व) सुधाकरपंत परिचारक आणि मोहिते पाटील यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. मात्र, मोहिते पाटील घराण्यातील पुढच्या पिढीचे शिलेदार आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी मागील कटू आठवणींना मूठमाती देत माजी आमदार प्रशांत परिचारक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत मैत्रीचे नवे पर्व आरंभिले आहे. (Ranjitsinh Mohite Patil wished former MLA Prashant Paricharak on his birthday)

माजी आमदार प्रशांत परिचारक यांचा बुधवारी (ता. ६ सप्टेंबर) वाढदिवस होता. या वाढदिवसानिमित्त आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी फेसबुक पोस्ट लिहित परिचारक यांना पेढा भरवतानाचा फोटो पोस्ट केला आहे. त्यामुळे मोहिते पाटील-परिचारक घराण्याची पुढची पिढी मागील सर्व घडामोडी विसरून एकत्र येताना दिसत आहे. विशेष म्हणजे रणजितसिंह यांनी पेढा भरवतानाचा फोटो टाकून त्यासाठी पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे.

Ranjitsinh Mohite Patil-Prashant Paricharak
Beed Crop Insurance : बीडमधील उर्वरित १३ मंडलांतील शेतकऱ्यांनाही अग्रिम पीकविमा मिळणार

खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून २००९ पर्यंत आणि एकत्र काँग्रेस असतानाही मोहिते पाटील यांचा शब्द सोलापूरच्या राजकारणात अंतिम हेाता. विजयदादांच्या नेतृत्वाखाली सुधाकर परिचारक, भाई एस. एम पाटील, गणपतराव देशमुख यांसारख्या दिग्गजापासून नवखे नेतेही काम करत होते. मात्र, २००९ च्या निवडणुकीनंतर त्यात बदल जाणवू लागला. मोहिते पाटील एकहाती सत्तेला आव्हान देण्यास सुरुवात झाली.

मुळात २००९ च्या निवडणुकीत माळशिरस मतदारसंघ राखीव झाल्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील यांनी पंढरपूरमधून लढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सुधाकर परिचारक नाराज होणे स्वाभाविक होते. तालुक्यातील कार्यकर्त्यांना मोहिते पाटील यांची एन्ट्री म्हणजे अतिक्रमण वाटले. त्यातूनच त्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री विजयदादांचा पराभव झाला आणि परिचारक-मोहिते पाटील कुटुंबीयांमध्ये अंतर पडत गेले. त्या पराभावनंतर परिचारक यांच्या भूमिकेविषयी उघडपणे बोलले गेले. मात्र, परिचारकारांनी संयम सोडला नव्हता.

Ranjitsinh Mohite Patil-Prashant Paricharak
Nagpur Congress News : गडकरींच्या वाड्याभोवताल, भाजपच्या गडात आज कॉंग्रेसची संवाद यात्रा !

सोलापूर राजकारणाचा पट २००९ नंतर बदलत गेला. सोलापूरच्या निर्णयप्रक्रियेतील अधिकाराचा केंद्रबिंदू अकलूजकडून माढ्याकडे सरकला. त्यानंतर मोहिते पाटील यांची राजकारणात पिछेहाट सुरू झाली. समविचारी आघाडीच्या माध्यमातून सोलापूरचे राजकारण सुरू झाले. त्या समविचारीमध्ये माजी आमदार प्रशांत परिचारक हे निर्णयाक भूमिकेत होते. जिल्हा परिषद, विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीला पर्यायाने मोहिते पाटील यांना हादरे बसण्यास सुरुवात झाली. त्यानंतर मोहिते पाटील हे हळूहळू बाजूला पडत गेले.

Ranjitsinh Mohite Patil-Prashant Paricharak
Maratha Reservation News : ओबीसी कोट्याला धक्का न लावता 'मराठा आरक्षण' देणार; मुख्यमंत्र्यांची ग्वाही..

मोहिते पाटील घराण्यातील विजयदादांनंतर रणजितसिंह मोहिते पाटील हे राजकारणात पुढे आले आहेत, तर माजी आमदार प्रशांत परिचारक हे परिचारक यांचा राजकीय वारसा पुढे चालवत आहेत. पंढरपुरातील पराभवाचे शल्य विसरत रणजितदादांनी प्रशांत परिचारक यांना फेसबुक पोस्ट करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्या पोस्टसोबत परिचारक यांना पेढा भरवितानाचा फोटो जोडून मोहिते पाटील यांनी बेरजेचे राजकारण केल्याचे मानले जात आहे. त्यातच लोकसभा निवडणूक तोंडावर असून माढ्यातून मोहिते पाटील पुन्हा इच्छूक आहेत, त्यामुळे ही साखरपेरणी किती उपयोगाला येते, हे पाहावे लागेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com