Phaltan Political News : रणजितसिंह निंबाळकरांचे रामराजेंना प्रत्युत्तर; म्हणाले, कितीही षडयंत्रे करा, मी भीक घालणार नाही

Ranjitsinh Naik Nimbalkar रणजितसिंह निंबाळकर म्हणाले, मी श्रीराम कारखान्याच्या विषयावर यापूर्वी कधीही बोललो नाही. सहकारात राजकारण नको म्हणून ते टाळलं आहे.
Ramraje Naik Nimbalkar, Ranjitsinh Naik Nimbalkar
Ramraje Naik Nimbalkar, Ranjitsinh Naik Nimbalkarsarkarnama
Published on
Updated on

Phaltan Political News : माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी काल श्रीराम कारखान्याच्या सभेत आमच्या पायात पाय अडकवण्याचा प्रयत्न केला, तर त्याचा पाय काढला जाईल, अशी टीका केली होती. यावरून भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर रामराजेंना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिले आहे. खासदार निंबाळकर म्हणाले, जी संस्था शेतकऱ्यांच्या मालकीची आहे. त्या शेतकऱ्यांच्या पोरांचेच पाय काढायची भाषा जाहीरपणे करत असाल, तर आम्ही हे खपवून घेणार नाही आणि सहनही करणार नाही. माझ्या विरोधात अनेक राजकीय षडयंत्रे करा, मी अजिबात भीक घालणार नाही.

खासदार रणजितसिंह Ranjitsinh Naik Nimbalkar म्हणाले, गेल्या तीन दिवसांपूर्वी श्रीराम साखर कारखान्याच्या सभेत जे स्वत:ला फलटण तालुक्याचे अधिपती म्हणवून घेतात ते श्रीमंत रामराजे Ramraje Naik Nimbalkar यांनी निवृत्त अधिकारी विश्वासराव भोसले यांचे पाय काढले जातील, असं वक्तव्य केले आहे. मी श्रीराम कारखान्याच्या विषयावर यापूर्वी कधीही बोललो नाही. सहकारात राजकारण नको म्हणून टाळलं आहे. सहकारी संस्था अडचणी आणण्याचा प्रयत्न केलेला नाही.

पण, जी संस्था शेतकऱ्यांच्या मालकीची आहे. त्या शेतकऱ्यांच्या पोरांचेच पाय काढायची भाषा जाहीरपणे करत असाल, तर आम्ही खपवून घेणार नाही आणि सहनही करणार नाही. स्वत: कुबड्या घ्यायच्या, बापजाद्याने काढलेले कारखाने दुसऱ्याला चालवायला द्यायचे, १५ वर्षे कारखान्याचा हिशेब झालेला नाही. जमीन, उत्पन्न किती हे माहिती नाही. कारखान्याला १२ ते १३ कोटी भाडे वर्षाला मिळले पाहिजे होते.

आता हा कारखाना केवळ ५० लाखांत चालवायला द्यायचा आहे. एखादा पेट्रोल पंप यापेक्षा जास्त किमतीला चालवायला देतात. हा भ्रष्टाचार होतोय हे न कळायला आम्ही दुतखुळे आहोत का, असा प्रश्न खासदार निंबाळकर यांनी केला. शेतकरी व दराविषयी बोललो त्यांचा हा हक्क आहे. कारण हा त्यांच्या स्वत:च्या मालकीचा नाही. शेतकऱ्यांचा कारखाना आहे.

Ramraje Naik Nimbalkar, Ranjitsinh Naik Nimbalkar
Satara Good News : आनंदाचा शिधा वितरणात मुख्यमंत्र्यांचा जिल्हा राज्यात प्रथम

स्वत:चा कारखाना काढा आणि दर द्या. स्वराज्यावर बोलण्याचा त्यांना अधिकार नाही. आम्ही हिंमतीवर कारखाने उभे केले आहेत. तालुक्यातील सर्वात मोठा कारखाना स्वराज्य असून, दर आणि पेमेंटही वेळेत हा कारखाना देतो. तुम्हाला बॅंक चालवता आली नाही.

दूध संघ बंद पाडला. खरेदी-विक्री संघ बंद पाडला, साखरवाडीच्या कारखान्याचे वाटोळे केले. तासगावकरांना कारखाना काढून दिला नाही. स्वत: कारखाना काढतो म्हणून फलटणकरांना फसवले. तुम्हाला खूपतंय काय, असा प्रश्न करून खासदार निंबाळकर म्हणाले, यापूर्वी त्यांनी स्वराज्य कारखाना बंद पाडण्यासाठी प्रयत्न केले. माझ्या विरोधात अनेक राजकीय षडयंत्रे केली, पण मी त्यांच्या षडयंत्रांना अजिबात भीक घालत नाही.

Edited By Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com