Satara Good News : आनंदाचा शिधा वितरणात मुख्यमंत्र्यांचा जिल्हा राज्यात प्रथम

Satara District सातारा जिल्ह्यात तीन लाख 88 हजार 907 पात्र शिधापत्रिकांधारकांपैकी तीन लाख 78 हजार 934 शिधापत्रिकाधारक कुटुंबांना आनंदाचा शिधाचे वितरण करण्यात आले आहे.
Jitendta Dudi, Eknath Shinde
Jitendta Dudi, Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on

Satara Anandacha Shidha News : राज्यातील गोरगरीब जनतेला गौरी, गणपती उत्सव आनंदाने साजरा करता यावा, यासाठी शासनाने आनंदाचा शिधा उपलब्ध करून दिला होता. या शिधा वितरणात सातारा जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. पुरवठा विभागाने जिल्ह्यात ९७.४४ टक्के शिधा वितरण पूर्ण केले आहे.

सातारा जिल्ह्यात Satara District तीन दिवस नेट सुविधा बंद असतानाही पुरवठा विभागाचे Supply Office सर्व अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या अथक परिश्रमामुळे ऐन सणाच्या कालावधीत 97.44 टक्के शिधा वितरण पूर्ण झाले आहे.

पुरवठा विभागाने शिधा वितरणात राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. सातारा जिल्ह्यात तीन लाख 88 हजार 907 पात्र शिधापत्रिकांधारकांपैकी तीन लाख 78 हजार 934 शिधापत्रिकाधारक कुटुंबांना आनंदाचा शिधाचे वितरण करण्यात आले आहे.

सातारा जिल्ह्याच्या पाठोपाठ भंडारा जिल्ह्याने 97.37 टक्के, तर गोंदिया जिल्ह्याने 96.53 टक्के वितरण करून अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला आहे. सातारा जिल्ह्याच्या या यशाबद्दल जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पुरवठा विभागाच्या यंत्रणेचे अभिनंदन केले आहे.

Edited By Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com