राठोडांनी दाबलेला चौकशी अहवाल शिक्षणाधिकारी लोहारांनी काढला बाहेर

पुरस्कार दिलेल्या संस्थेकडून झालेला पत्रव्यवहार सादर करण्यास रंजित डिसले (Ranjit Disley ) यांनी नकार दिला, असे अहवालात म्हटले आहे.
Ranjit Singh Disley
Ranjit Singh Disley Sarkarnama
Published on
Updated on

सोलापूर : ग्लोबल टिचर रणजित डिसले (Ranjit Disle) यांच्या विरोधात झालेल्या तक्रारींच्या चौकशीचा दाबण्यात आलेला अहवाल आता शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी बाहेर काढला आहे. याप्रकरणाच्या चौकशीसाठी पाच सदस्यीय चौकशी समिती नेमण्यात आली होती. याबाबत समितीने मार्च 2021 मध्ये अहवाल सादरही केला होता. मात्र, तत्कालिन शिक्षणाधिकारी व परिक्षा परिषदेचे उपायुक्त संजयकुमार राठोड (Sanjaykumar Rathod) यांनी चौकशी अहवाल दाबला होता. आता लोहार यांनी या प्रकरणी योग्य तो निर्णय घ्यावा, असा प्रस्ताव सीईओ (CEO) दिलीप स्वामी (Dilip Swami) यांच्याकडे सादर केला आहे.

Ranjit Singh Disley
"मला सोड अन्यथा... अख्ख्या अंबाजोगाईत माझी दहशत" ; आमदार मुंदडांच्या पतीला धमकी

या प्रकरणी सीईओ स्वामी काय निर्णय घेणार? चौकशी समिती अहवाला उपस्थित केलेल्या मुद्यांवर डिसले यांच्यावर कारवाई होणार की डिसले यांना क्‍लिनचिट दिली जाणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

परितेवाडी (ता. माढा) येथील जिल्हा परिषद शाळेचे उपशिक्षक रणजित डिसले यांच्या पुरस्काराबाबत चौकशी करावी अशी मागणी 2017 मध्ये करण्यात आली होती या मागणीवरून पाच सदस्यांची चौकशी समिती गठित करण्यात आली. त्यामध्ये मुख्याध्यापक रामेश्वर लोंढे, प्रभारी विस्ताराधिकारी सुभाष दाढे, प्रभारी विस्ताराधिकारी उमा साळुंके, विस्ताराधिकारी बंडू शिंदे, गटशिक्षणाधिकारी मारुती फडके या पाच जणांचा समावेश होता. अर्जातील मुद्द्यानुसार या समितीने गावात जाऊन चौकशी केली होती.

Ranjit Singh Disley
बोगस लष्कर भरतीच्या मुख्य सूत्रधारास पिंपरी पोलिसांनी विमानाने आणले पकडून

डिसले यांनी प्राप्त पुरस्कारासाठी आपले नामांकन सादर करण्यासाठी या कार्यालयाची परवानगी घेतली नाही. पुरस्कार दिलेल्या संस्थेकडून झालेला पत्रव्यवहार सादर करण्यास डिसले यांनी नकार दिला. पुरस्कारासाठी सादर केलेले कोणतेही फोटो, व्हिडिओ, क्‍लिप्स, स्वतःचा पासपोर्ट, मोबाईल संभाषण, ई-मेल ही माहिती चौकशी समिती समोर सादर करण्यास डिसले यांनी नकार दिला असल्याचे समितीने अहवालात म्हटले आहे. डिसले यांनी त्यांचा शैक्षणिक प्रकल्प पुरस्कार देणाऱ्या संस्थेला सादर करण्यापूर्वी या कार्यालयाची परवानगी घेतली नाही. या कार्यालयास त्याबाबतची कसलीही माहिती दिली नसल्याचेही या अहवालात म्हटले आहे. या समितीने 30 मार्च 2021 रोजी सोलापूरचे तत्कालीन शिक्षणाधिकारी संजीवकुमार राठोड यांना सादर केला होता. आता हा अहवाल शिक्षणाधिकारी लोहार यांनी सीईओ स्वामी यांच्याकडे पाठविला आहे.

याबाबत तत्कालिन शिक्षणाधिकारी राठोड म्हणाले की, चौकशी अहवाल माझ्या काळात प्राप्त झाला होता. त्यावर गट शिक्षणाधिकाऱ्यांसोबत चर्चा आवश्‍यक होती. त्यासाठी मी या फाईलवर चर्चा करावी असे लिहिले. शिवाय डायटकडील माहितीही आवश्‍यक होती. नंतरच्या कालावधीत हा विषय माझ्याकडून राहून गेला, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. तर, शिक्षणाधिकारी लोहार यांनी चौकशी अहवालावर निर्णय अपेक्षित असून चौकशी अहवाल प्रलंबित ठेवणे योग्य नाही. नियमानूसार कार्यवाहीसाठी मी हा अहवाला मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांच्याकडे सादर केल्याचे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com