बोगस लष्कर भरतीच्या मुख्य सूत्रधारास पिंपरी पोलिसांनी विमानाने आणले पकडून

आरोपी हे आयटीआय (ITI) मेकॅनिकचा कोर्स पास झालेल्यांची यादी मिळवून त्यातील एकेका तरुणाला गाठत होते.
Rajesh kumar
Rajesh kumar Sarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : लष्कर भरतीचं मोठं रॅकेट औंध, पुणे येथील मिलीटरी कॅम्पच्या इंटेजिलन्स विभागामुळे नुकतेच उघडकीस आले. ते चालवणाऱे लष्करातील दोन निवृत्त जवान आणि त्यांचा साथीदार एजंट अशा तिघांना सांगवी पोलिसांनी (Pimpri Police) ७ जानेवारी रोजी अटक केली होती. आता या रॅकेटचा मुख्य सूत्रधार असलेला बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचा (बीआरओ) दिल्लीतील लेफ्टनंट कर्नल दर्जाचा अधिकारी राजेशकुमार याला शुक्रवारी (ता.२१ जानेवारी) पकडण्यात आले. दरम्यान, या गुन्ह्याची व्याप्ती व गांभीर्य लक्षात घेऊन त्यासाठी आता पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश (Krishna prakash) यांनी एसआयटीचीच (SIT) स्थापना केली गेली आहे.

Rajesh kumar
नक्षल्यांनी १५ ट्रॅक्टर, २ जेसीबी व एक ग्रेडर वाहन जाळले...

लष्करात व्हेईकल मॅकनिक म्हणजे वाहन तंत्रज्ञ या पदासाठी या टोळीने राज्यातील अनेक होतकरू गरजू तरुणांकडून प्रत्येकी पाच लाख रुपये घेतलेले आहेत. त्यात सतीश ढाणे, अक्षय वानखेडे हे निवृत्त लष्करी जवान आणि त्यांचा एजंट साथीदार श्रीराम कदम हे सत्तर हजार रुपये घेताना रंगेहात पकडले होते. त्यांच्या चौकशीतून सदर पदाच्या परिक्षेच्या प्रश्नपत्रिकांचे पेपर हे BRO दिल्ली येथील राजेश कुमार हा एझुक्युटिव्ही इंजिनियर /लेफ्टनंट कर्नल दर्जाच्या उच्च पदावरील अधिकाऱ्याने दिल्याचे समजले. त्यामुळे विशेष पथकाने त्याला दिल्लीहून पकडून विमानाने आणले. त्याला दहा दिवसांची पोलिस कोठडी मिळाल्याची माहिती हा गुन्हा दाखल असलेल्या सांगवी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील टोणपे यांनी 'सरकारनामाला' सांगितले. त्याची सर्व बँक अकाउंट फ्रीज केल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

Rajesh kumar
पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांचा आता संयम सुटतोय, गुन्हेगारांना दिला इशारा...

ढाणे हा लान्सलाईक, तर वानखेडे हा मेसन म्हणून लष्करातून निवृत्त झालेला आहे. तर, कदम हा भरतीपूर्व प्रशिक्षण संस्था चालवित होता. याबाबत गजानन मिसाळ (वय २३, रा. अमरावती) या तरुणाने फिर्याद दिली आहे. आऱोपींनी त्याच्याकडून पहिला हफ्ता म्हणून सत्तर हजार रुपये घेतलेही होते. त्यांचे मित्र धनंजय वट्टमवार (वय २१), निलेश निकम (वय २३, रा. मालेगाव), अक्षय साळूंके (वय २५, रा. चाळीसगाव) यांचीही फसवणूक झालेली आहे. आरोपी हे आयटीआय मेकॅनिकचा कोर्स पास झालेल्यांची यादी मिळवून त्यातील एकेका तरुणाला गाठत होते. लष्करात वाहन मेकॅनिक पदावर पाच लाख रुपयांत नोकरीला लावतो, असे सांगून ते त्यांची फसवणूक करीत होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com