Ravindra Dhangekar On Hasan Mushrif : कोल्हापुरात येऊन रवींद्र धंगेकरांचा हसन मुश्रीफांना इशारा,'माफी मागणार...'

Hasan Mushrif Pune Porsche Accident : पब संस्कृती थांबली पाहिजे ही माझी भूमिका आहे. पुण्यातील नागरिक गप्प बसणार नाही, हे लक्षात आल्यावर दोन पोलिस निलंबित केले, असे धंगेकर म्हणाले.
Hasan Mushrif, Ravindra
Hasan Mushrif, Ravindra sarkarnama

Ravindra Dhangekar News : रवींद्र धंगेकर यांनी माफी मागितली नाही तर त्यांच्यावर बदनामीचा दावा दाखल करण्याचा इशारा मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला होता. मुश्रीफ यांच्या इशाऱ्यानंतर रवींद्र धंगेकर आज (शुक्रवार) पहिल्यांदाच कोल्हापुरात आले होते.

धंगेकरांनी मुश्रीफांच्या इशाऱ्याला जशास तसे उत्तर दिले. 'मी हसन मुश्रीफ यांची माफी मागतो. पण पुण्यातील पब संस्कृती बंद केली पाहिजे. पब बंद होणार नसतील तर मी कुणाची माफी मागणार नाही.' असे धंगेकरांनी ठणकावून सांगितले.

करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या लग्नासाठी पुण्याचे आमदार रवींद्र धंगेकर Ravindra Dhangekar कोल्हापुरात आले होते. 'मी कुणाला घाबरत नाही. नोटीस द्या नाहीतर आणखी काही करा. पुण्यात येणाऱ्या प्रत्येक मुलाच्या संरक्षणासाठी मी रस्त्यावर उतरणार', असे धंगेकरांनी मंत्री मुश्रीफांसह मंत्री शंभूराज देसाई यांना ठणकावले. हसन मुश्रीफ यांच्या काळात डॉक्टर कसे वागतात हे त्यांना माहिती आहे, असा टोला ही धंगेकरांनी लगावला.

Hasan Mushrif, Ravindra
Pune Porsche Accident : अल्पवयीन मुलासह त्याच्या मित्रांचेही...; धक्कादायक माहिती समोर

'लोकशाही पद्धतीने मी रस्त्यावर आलो. पब संस्कृती थांबली पाहिजे ही माझी भूमिका आहे. पुण्यातील नागरिक गप्प बसणार नाही, हे लक्षात आल्यावर दोन पोलिस Police निलंबित केले. पण अजूनही हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होतोय असे दिसत आहे, असा आरोप आमदार धंगेकर यांनी केला.

पुन्हा रस्त्यावर उतरणार

लोकसभेचा निकाल लागल्यानंतर मी पुन्हा रस्त्यावर उतरणार. मला नोटीस पाठवण्यापेक्षा चुकीच्या गोष्टी बंद करा. मी मंत्र्यांच्या मतदारसंघात, मंत्र्यांच्या घरासमोर जाऊन माझे म्हणणे मांडणार आहे. माझ्यावर अब्रुनुकसानीचा दावा करून पैसे मागितले तर माझ्याकडे पैसे नाही मी जेलमध्ये जाईन. आम्हाला म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतोय, असं धंगेकर यांनी ठणकावले.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com