Pune Porsche Accident : अल्पवयीन मुलासह त्याच्या मित्रांचेही...; धक्कादायक माहिती समोर

Pune Accident News : अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांना 'ससून'मधून निलंबित करण्यात आलं आहे.
vedant agrawal
vedant agrawal sarkarnama

Porsche Hit And Run Case : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. पण, अल्पवयीन आरोपीच्या दोन मित्रांचेही रक्ताचे नमुने बदलण्यात आल्याचं खळबळजनक वास्तव समोर आलं आहे.

तीन अल्पवयीन मुलांचे जे रक्तगट होते, त्याच रक्तगटाचे इतर तीन जण बोलावण्यात आले होते. त्यात एक महिला आणि दोन पुरूषांचा समावेश आहे. निलंबित डॉ. श्रीहरी हळनोर कामावर असतानाच हाच प्रकार घडला होता, अशी माहिती मिळत आहे.

कल्याणीनगर भागात 19 मेला मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. अल्पवयीन मुलानं मद्य पिऊन 180 ते 200 किलोमीटर प्रतितास वेगानं गाडी चालवली होती. यावेळी दुचाकीला धडक दिल्यानं दोन जणांचा जागीचा मृत्यू झाला होता.

यानंतर अल्पवयीन मुलाला आणि त्याच्याबरोबर असलेल्या दोन मित्रांना ताब्यात घेऊन दुसऱ्या दिवशी रूग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आणले होते. तेव्हा, तिघांचे रक्त तपासणीसाठी घेण्यात आले. पण, रक्त तपासणीसाठी त्यांचे रक्त न देता त्यांच्याऐवजी इतर तीन व्यक्तींचे रक्त नमुने पोलिसांच्या ताब्यात दिले.

ते त्यांचेच आहेत, हे भासवण्यासाठी आरोपींचा जो रक्तगट आहे, त्याच रक्तगटाचे तीन जण आहेत ना, याची दक्षता घेतल्याचं सांगितलं जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिकाऊ डॉक्टरांनी घेतले रक्ताचे नमुने

तीन आरोपींच्या रक्ताचे नमुन शिकाऊ डॉक्टरांनी घेतले होते. रक्ताचे नमुने बदलल्यानंतर डॉक्टर श्रीहरी हळनोरला पश्चाताप झाला होता. मात्र, तोपर्यंत वेळ निघून गेली होती.

vedant agrawal
Porshe Accident Pune : मॅडमनी खरच काही विचारले नाही, सांगा की पुणे CP साहेब?

'ते' रक्त अल्पवयीन मुलाच्या आईचे नाहीतर...

दरम्यान, अल्पवयीन मुलांचं रक्त कचऱ्यात फेकून त्याऐवजी दुसऱ्याच कुणाचेतरी रक्त दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. मात्र, अल्पवयीन मुलाच्या आईनं ते रक्त दिल्याची चर्चा सुरु होती.

परंतु, रक्तांच्या नमुन्याचा प्राप्त झालेला अहवाल आणि नमुन्यांसाठी दिलेलं रक्त अल्पवयीन मुलाच्या आईचे नसल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे. त्यामुळे ते रक्त नेमकं कुठल्या महिलेचे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

vedant agrawal
Governor Ramesh Bais On Porsche Car Accident : राज्यपाल बैस म्हणतात;...तर 'कल्याणीनगर'सारखी दुर्घटना घडलीच नसती!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com