'किसन वीर'चा करार मोडण्यास तयार; पंधरा दिवसांत खंडाळा कारखाना सुरू करा...

आम्ही शेतकऱ्यांसाठी जीवाचे रान करुन हा कारखाना उभा केला आहे, म्हणून कोणालाही याचे ऑडिट करायचा अधिकार नाही. हिशोब काय मागता, कारखाना उभारणीस का धावुन आला नाही, असा प्रश्न मदन भोसले यांनी उपस्थित केला.
Madan Bhosale
Madan BhosaleAspak Patel
Published on
Updated on

खंडाळा : खंडाळा शेतकरी सहकारी साखर कारखाना गाळप हंगाम सुरु करायला वर्षाचा कालावधी का घालवता? किसन वीर बरोबर असलेला भागीदारी करार आठ दिवसांत मोडायला आम्ही तयार आहोत. हा कारखाना येणाऱ्या पंधरा दिवसात सुरु करावा, असे आव्हान किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी खंडाळा कारखान्याच्या नवीन सत्ताधाऱ्यांसह आमदार मकरंद पाटील यांना दिले.

खंडाळा कारखान्यातील पराभवानंतर माजी आमदार मदन भोसले यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, नवनिर्वाचित सत्ताधारी यांना हवी ती मदत करायला तयार आहे. आम्ही शेतकऱ्यांसाठी हा कारखाना जिवाचे रान करुन उभा केला आहे, म्हणून कोणालाही याचे ऑडिट करायचा अधिकार नाही. हिशोब काय मागता, कारखाना उभारणीस का धावुन आला नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. प्रश्न विचारण्यापेक्षा उभा केलेला कारखाना 15 दिवसांत सुरु करा, यासाठी भागीदारीचा 18 वर्षाचा करार आठ दिवसांत तडजोड करायला तयार आहे.

Madan Bhosale
शरद पवारांनी जे केले तेच मकरंद पाटील वाईत करणार

आपणास उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील तसेच जिल्हा मध्यवती बँकेची सुध्दा साथ आहे. म्हणून करार मोडायला वर्षभर लागणार नाहीत. सर्व मदत करायला तयार आहे. मात्र, स्वतःच्या जमिनी तारण ठेवणाऱ्या या संचालकांना वाऱ्यावर सोडु नका, अशी अपेक्षा श्री. भोसले यांनी व्यक्त केली. खंडाळा कारखाना निवडणुकीत आलो नाही, याबद्दल बोलताना श्री. भोसले म्हणाले, खंडाळ्याच्या राजकारणात मी ढवळाढवळ करत नाही. तसेच मला बोलविण्यात ही आले नाही. यावर गाढवे सरांना विचारा याबाबत शंकरराव गाढवे यांनी ही दुजोरा दिला.

Madan Bhosale
'किसन वीर'ला कोणीही रोखू शकत नाही : मदन भोसले

मोठे जीवाचा रान करुन हा कारखाना उभा केला. यासाठी खुप यातना ही सोसल्या आहेत. म्हणून माझ्या कामाचे ऑडिट करु नका, आपण कारखाना उभारणीस काय केले, हे स्पष्ट करा. यावेळी कोणीही इकडे फिरकले सुध्दा नाही. तरी याविषयावर बोलण्यापेक्षा हा कारखाना त्वरीत सुरु करावा. एवढीच माफक अपेक्षा मदन भोसले यांनी व्यक्त केली. तसेच सुरुवातीलाच निवडुन आलेल्या सर्व संचालकांचे त्यांनी अभिनंदन ही केले.

Madan Bhosale
सहकारातील चुकीच्या प्रवृत्तींवर कारवाई करा : अजित पवार

शंकरराव गाढवे म्हणाले, शेतकऱ्यांसाठी हा कारखाना उभा केला. यासाठी मदनदादाचे सहकार्य मिळाले. सहकारला हा शेवटचा असणारा कारखाना सहकाराचाच राहावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. शंकरराव गाढवे यांचा वाढदिवस असताना अपेक्षा व्यक्त केली, कि माझे, सर्व स्वप्न पुर्ण झाले आहेत. मात्र, म्हावशीच्या माळरानावर खंडाळा कारखाना उभा करण्यासाठी किसन वीरने मदत करावी आणि याच अपेक्षापूर्तीसाठी किसन वीरने खंडाळा कारखान्यासाठी मदत केली असल्याची आठवण किसन वीरचे अध्यक्ष मदन भोसले यांनी सांगितली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com