Mahabaleshwar News : आरोपी अगरवालचे महाबळेश्वर 'कनेक्शन'; सरकारी जागेत 'फाईव्ह स्टार' हॉटेल..?

Pune Accident Case : सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर मधील सरकारी जागेत अगरवालकडून नियम धाब्यावर बसवून फाईव्ह स्टार हॉटेल चालविले गेले. याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते अभय हवालदार यांनी एप्रिलमध्ये तक्रार केली.
Vishal Agarwal
Vishal Agarwalsarkarnama

Pune Hit And Run case : पुण्यातील कल्याणीनगर अपघातातील मुख्य आरोपी विशाल अगरवाल यांचे सातारा (Satara) जिल्ह्यातील महाबळेश्वर मधील कनेक्शन उघड झाले आहे. त्याच्या नावावर 'एमपीजी क्लब' हे फाईव्हस्टार हॉटेल सरकारी जागेत उभारले आहे. याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते अभय हवलदार यांनी ही माहिती समोर आणली आहे. आता या हॉटेलवर कारवाई करावी, अशी मागणी आता होत आहे.

सातारा (Satara) जिल्ह्यातील महाबळेश्वर मधील सिटी सर्व्हे नंबर 233 या सरकारी मिळकत असून ही मिळकत पारशी जिमखाना या ट्रस्टला तीस वर्षांच्या कराराने देण्यात आली आहे. या मिळकतीच्या भाडेपट्ट्याचे नुतनीकरण करण्यात आले आहे. 2016 मध्ये पारशी जिमशाना या ट्रस्टवर पारशी नसलेले सुरेंद्रकुमार अगरवाल व उषा सुरेंद्रकुमार अगरवाल यांना घेण्यात आले आहे. त्यानंतर केवळ चार वर्षांनी म्हणजे 2020 मध्ये पारशी जिमखाना ट्रस्टवर असलेल्या या सर्व ट्रस्टींची नावे कमी होऊन त्या ठिकाणी विशाल अगरवाल (Vishal Agarwal) यांच्या कुटुंबातील व्यक्तींची नावे ट्रस्टी म्हणून दाखल करण्यात आली आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Vishal Agarwal
Pune Accident Porsche : पोर्श कारमधील 'तो' दुसरा मुलगा कोण ? अपघात होऊन दहा दिवसानंतरही माहिती गुलदस्त्यातच !

पारशी जिमखाना ट्रस्टला जी सरकारी मिळकत दिली आहे, ती केवळ रहिवासासाठी दिली होती. त्यानंतर या मिळकती पैकी भाग हा वाणिज्य करुन घेऊन त्याचा वापर सुरू झाला आहे. आता पारशी जिमखाना ऐवजी या ठिकाणी 'एमपीजी क्लब' पाईव्हस्टार हॉटेल सुरू करण्यात आले आहे. या हॉटेलसाठी विनापरवाना बांधकाम झाले आहे. याच मिळकतीत बार आणि स्पा देखील आहे. या ठिकाणी नियम धाब्यावर बसवून फाईव्हस्टार हॉटेल चालविले जात असल्याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते अभय हवालदार यांनी एप्रिलमध्ये तक्रार केली होती. आता या हॉटेलवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

पुणे (Pune) अपघात आणि त्यातील आरोपींविषयी दिवसेंदिवस नवीन खुलासे होत आहेत. सरकार आरोपींना वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, असा आरोप विरोधकांकडून होत आहे. आता पुन्हा सुरेंद्रकुमार अगरवाल याचे महाबळेश्र्वर मधील फाईव्हस्टार हॉटेल सरकारी जागेत असून, ही जागा रहिवासासाठी दिली होती, असे समोर आले आहे. त्यामुळे विशाल अगरवाल याचा आणखी एक 'कारनामा' समोर आला आहे.

Vishal Agarwal
Sunil Tingre News : 'ते' जुनं पत्र व्हायरल, विरोधकांकडून दिवसभर फायरिंगवर फायरिंग! अन् अखेर रात्री उशिरा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com