Rohit Patil : रोहित पाटलांकडून 'स्कोअर' बरोबरीत आणण्यासाठी फिल्डिंग; अस्तित्वाच्या लढाईसाठी संजयकाकाही देतायेत टशन

Rohit Patil : रोहित पाटील यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची, तर संजय पाटील यांच्यासाठी अस्तित्वाची ठरणार आहे. अर्ज माघारीनंतर दोन्ही गट आमनेसामने येत तीव्र आणि रंगतदार लढत उभी राहिली आहे.
Rohit Patil and Sanjay Patil camps intensify campaigns as both leaders face a high-stakes municipal election marked by rivalry and shifting alliances.
Rohit Patil and Sanjay Patil camps intensify campaigns as both leaders face a high-stakes municipal election Sarkarnama
Published on
Updated on

Tasgav Election : नगरपालिका निवडणुकीचा आता दुसरा टप्पा सुरू झाला आहे. अर्ज माघारीनंतर सर्व चित्र स्पष्ट झाले आहे. तासगाव नगरपालिका निवडणुकीत 'आबा' विरुद्ध 'काका' हे दोन पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी गट आमनेसामने आले आहेत. आमदार रोहित पाटील यांच्यासाठी ही लढत प्रतिष्ठेची, तर माजी खासदार संजय पाटील यांच्यासाठी अस्तित्वाची असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या पालिकेकडे लागले आहे.

नगरपालिकेची निवडणूक प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या कारणाने गाजत असते. गत निवडणुकीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत झाली होती. या अटीतटीच्या लढतीमध्ये माजी खासदार संजय पाटील यांनी भाजपचा झेंडा पालिकेवर फडकवत एकहाती सत्ता काबीज केली होती. आता संजय पाटील हे भाजपला रामराम ठोकत स्वतंत्र विकास आघाडीच्या झेंड्याखाली निवडणुकीत उतरले आहेत.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर संजय पाटील यांच्यासाठी पालिकेची लढत ‘करो वा मरो’ अशी अस्तित्वाची असणार आहे. त्यामुळे उमेदवारी देण्यापासून त्यांनी व्यक्तिशः लक्ष घालून रोहित पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान उभे केले आहे. आमदार रोहित पाटील यांच्यासाठी पालिकेची ही पहिली निवडणूक आहे.

Rohit Patil and Sanjay Patil camps intensify campaigns as both leaders face a high-stakes municipal election marked by rivalry and shifting alliances.
Rohit Patil News: रोहित पाटलांनी शेवटच्या क्षणी उमेदवारी नाकारली; संजयकाकांनी नाट्यमयरित्या जवळचा माणूस फोडला

गत निवडणूक माजी आमदार सुमन पाटील आणि स्मिता पाटील यांनी मोठ्या ताकदीने लढवली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार अगदी नाममात्र फरकाने पराभूत झाला होता. यावेळी पालिकेची सत्ता खेचून आणण्याची आमदार रोहित पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी असल्याने. त्या दृष्टीने आमदार रोहीत पाटील यांच्यासाठी ही लढत अत्यंत प्रतिष्ठेची आणि त्यांची राजकीय चुणूक दाखवून देणारी असेल.

रोहित पाटील यांनी पूर्णपणे नवी टीम मैदानात उतरवली आहे. भाजपने याही वेळी शड्डू ठोकला आहे. गत निवडणुकीत तत्कालीन खासदार संजय पाटील यांच्या नेतृत्वात पालिकेवर भाजपचा झेंडा फडकला होता. त्यामुळेही भाजपच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) अजित पवार गटानेही यावेळी निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे.

Rohit Patil and Sanjay Patil camps intensify campaigns as both leaders face a high-stakes municipal election marked by rivalry and shifting alliances.
Sangli Election: उमेदवारी मिळो अथवा ना मिळो,इच्छुकांचा डाव ठरला; शिराळा नगरपंचायत निवडणुकीत गणित बिघडवणार

पाच उमेदवार रिंगणात -

नगराध्यक्षपदासाठी पाच उमेदवार रिंगणात असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार वासंती बाळासो सावंत, संजय पाटील गटाकडून विजया बाबासो पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या ज्योती अजय पाटील, भाजपच्या (BJP) विद्या सागर चव्हाण, शिवसेना उद्धाव ठाकरे गटाकडून रंजना अंकुश चव्हाण लढाईत उतरल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com