Sangli Election: उमेदवारी मिळो अथवा ना मिळो,इच्छुकांचा डाव ठरला; शिराळा नगरपंचायत निवडणुकीत गणित बिघडवणार

Sangli Election: सांगली जिल्ह्यातील दुर्गम भाग समजला जाणारा शिराळा तालुका! याच शिराळा नगरपंचायतीसाठी इच्छुकांनी काय पण करण्याची तयारी ठेवली आहे.
BJP and Congress face key challenges ahead of the Nagpur municipal elections—weak leadership and internal disputes threaten their campaigns.
BJP and Congress Sarkarnama
Published on
Updated on

सांगली जिल्ह्यातील दुर्गम भाग समजला जाणारा शिराळा तालुका! याच शिराळा नगरपंचायतीसाठी इच्छुकांनी काय पण करण्याची तयारी ठेवली आहे. त्याची महाविकास आघाडीतील पक्षांना आणि महायुतीतील घटक पक्षांना देखील धास्ती आहे. पक्षाकडून उमेदवारी मिळो अगर ना मिळो आपण निवडणुकीच्या रिंगणात असणार हा बेतच इच्छुकांनी आखला आहे. त्यामुळे ऐनवेळी बंडखोरी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे आतापासूनच अनेकांनी डबक्या पावलाने व्यूहरचना आणि तयारी जोराची ठेवली आहे.

BJP and Congress face key challenges ahead of the Nagpur municipal elections—weak leadership and internal disputes threaten their campaigns.
Kerala SIR: केरळमध्ये SIR सुरु! फॉर्म वाटपासाठी गेलेल्या BLOच्या अंगावर सोडला कुत्रा; नागरिकांमध्ये इतका राग का?

शिराळा नगरपंचायतीतील राजकारण पाहिले तर मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार मानसिंगराव नाईक हे विजयी झाले होते. त्याचा फायदा नगरपंचायतीच्या निवडणुकीत झाला. मानसिंगराव नाईक यांच्या गटाची सत्ता या नगरपंचायतीवर आली. तिरंगी लढत होत असताना माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या गटाने अकरा, तर शिवाजीराव नाईक सम्राट महाडिक यांच्या गटाने ६ जागांवर विजय मिळवला होता. तर सध्याचे विद्यमान आमदार सत्यजित देशमुख यांच्या गटाला पराभव स्वीकारावा लागला होता.

BJP and Congress face key challenges ahead of the Nagpur municipal elections—weak leadership and internal disputes threaten their campaigns.
Bihar Election 2025: भाजप नेत्यांचा कारनामा! सहा महिन्यांपूर्वी केलं दिल्ली विधानसभेला मतदान, आता बिहारमध्येही...

सध्याचे राजकीय परिस्थिती पाहिली तर भाजपचे सध्याचे विद्यमान आमदार सत्यजित देशमुख आहेत. तर सम्राट महाडिक यांच्याच घरात भाजपचे जिल्हाध्यक्ष पद आहे. शिवाय युती सरकारनं नागपंचमी सण साजरा करण्याच्या अटी शिथिल केल्यानंतर शिराळकरांचा कौल हा काही अंशी युतीच्या बाजूने झुकला आहे. पण स्थानिक पातळीवर गटातटाला महत्त्व असते. त्यामुळे या निर्णयानंतर पहिल्यांदाच निवडणूक होणार असल्याने शिराळात नगरपंचायतीतील कौल कोणाला मिळणार याकडे देखील लक्ष लागून राहिले आहे.

BJP and Congress face key challenges ahead of the Nagpur municipal elections—weak leadership and internal disputes threaten their campaigns.
Top 10 News: भाजप नेत्यांनी सहा महिन्यांपूर्वी दिल्लीत आता बिहारमध्ये केलं मतदान ते अमित शाह 'प्लॅन' बदलणार, नितीश कुमारांना धक्का देत...

शिराळा नगरपंचायतीसाठी १७ जागांसाठी निवडणूक होणार असून एक नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. नगराध्यक्ष पदाचे आरक्षण खुले झाल्याने अनेकांची भाऊगर्दी या नगराध्यक्ष पदासाठी आहे. त्यामुळे महायुतीतील घटक पक्षांची देखील चढाओढ वाढली आहे. त्यासाठी भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेत अधिक रस्सीखेच निर्माण झाली आहे. आमदार भाजपचे खासदार शिवसेनेचे असल्याने दोन्ही कडील कार्यकर्त्यांच्या आशा अधिकच रुंदावले आहेत. त्यामुळे नगरपंचायतीसाठी काय पण? हीच भूमिका घेऊन अनेक इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com