Ahilyadevi Holkar Jayanti : अहिल्यादेवी होळकर जयंतीवरुन रोहित पवार-राम शिंदे आमने सामने ; पवारांनी मध्यरात्रीच..

Ahilyadevi Holkar Jayanti : होळकर यांची जयंती साजरी होत असताना सत्ताधारी आणि विरोधक असे दोन गट पडल्याचे दिसते.
Ahilyadevi Holkar Jayanti news
Ahilyadevi Holkar Jayanti news Sarkarnama
Published on
Updated on

Ahilyadevi Holkar Jayanti : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त (Birth Anniversary)त्यांचे जन्मगाव असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे आज (बुधवारी) विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

आज होणाऱ्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, इंदूरच्या होळकर संस्थानांचे श्रीमंत राजे यशवंतराव होळकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यानिमित्त सकाळी पाच वाजता येथील महादेव मंदिरात जलाभिषेक करण्यात आला.

अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विविध शासकीय कार्यक्रमाचे आयोजन केले आहेत. अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी होत असताना सत्ताधारी आणि विरोधक असे दोन गट पडल्याचे दिसते.

Ahilyadevi Holkar Jayanti news
Lok Sabha elections : लोकसभा जागांबाबत पवारांची भूमिका स्पष्ट ; म्हणाले, "ज्या ठिकाणी ठाकरे गटातील खासदार आहेत, त्या जागा.."

यावर बोलताना आमदार राम शिंदे यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीत कोणीही राजकारण आणण्याचा प्रयत्न करू नका असे आवाहन केले.अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त यावर्षी नगर जिल्ह्यातील राजकारण तापलं आहे. होळकर जयंती समितीचे अध्यक्ष भाजप आमदार राम शिंदे आहेत.

शासकीय कार्यक्रमात एकीकडे स्वागत अध्यक्ष भाजप आमदार राम शिंदे यांनी सकाळी कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार रोहित पवार यांनी काल मध्यरात्रीत पूजा करुन मिरवणूक काढली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कर्मभूमीतून उज्जैन येथून आणलेल्या हत्तीची चौंडीमध्ये पूजा करण्यात आली. यावेळी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते. यावरुन रोहित पवार आणि राम शिंदे पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभे ठाकले आहे.

Ahilyadevi Holkar Jayanti news
Maharashtra Govt : फडणवीस 'सुपर सीएम’ टीकेला शिंदेंनी दिलं उत्तर ; 11 महिन्यात शिंदेंची सरशी

गेल्या वर्षी जयंती कार्यक्रमात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. तेव्हाही अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त राजकारण समोर आले होते. यंदाही यावरुन राजकारण रंगले आहे. कारण बुधवारी सकाळी साडेपाच वाजता शासकीय कार्यक्रमांना सुरुवात होणार होती. मात्र, रोहित पवार यांनी मध्यरात्री जयंती उत्सवाला सुरुवात केली.

चौंडी या गावातील विविध ठिकाणी रोहित पवार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व भाविकांच्या स्वागताचे फलक लावले आहेत. रोहित पवार यांनी केलेले बॅनरबाजीला मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस काय उत्तर देणार हे दुपारी समजेल.

अहिल्याबाई होळकर यांचा जन्म ३१ मे १७२५ रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या खेड्यात झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते. अहिल्यादेवी यांचे आजोळ उस्मानाबाद जिल्ह्यातील चोराखळी हे गांव होते. त्यांच्या मामांचे आडनाव मैंदाड होते. स्त्रीशिक्षण फारसे प्रचलित नसतानाही त्यांच्या वडिलांनी त्यांना लिहिण्यावाचण्यास शिकवले होते. त्यांनी भारतभर केलेल्या लोककल्याणकारी अहिल्यादेवी यांना पुण्यश्लोक म्हणतात.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com