Maharashtra Govt : फडणवीस 'सुपर सीएम’ टीकेला शिंदेंनी दिलं उत्तर ; 11 महिन्यात शिंदेंची सरशी

Eknath Shinde decisions in 11 months : आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयापेक्षा अधिक वेगवान शिंदे-फडणवीस सरकार असल्याचे दिसते.
 Eknath Shinde| Devendra Fadanvis
Eknath Shinde| Devendra FadanvisSarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde decisions in 11 months : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी जून महिन्यात बंडाचं निशाण फडकावल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपल्या पदावरून पायउतार व्हावं लागलं होतं.

अनेक नाट्यमय घडामोडींनंतर 30 जून 2022 रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यावेळी शिंदे यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांनीदेखील उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. ३० जून २०२२ ला नवीन सरकारचा शपथविधी होऊन शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले.

शिंदे-फडणवीस यांनी शपथ घेतल्याच्या दिवशीपासूनच कामाचा सपाटा लावला आहे. पण नंतरच्या काळात सरकारमधील मंत्री केवळ गणेशोत्सव, दहीहंडी, नवरात्र यांच्यासारख्या कार्यक्रमांनाच फक्त हजेरी लावतात, अशी टीका विरोधकांकडून करण्यात येत होती.

 Eknath Shinde| Devendra Fadanvis
Lok Sabha elections : लोकसभा जागांबाबत पवारांची भूमिका स्पष्ट ; म्हणाले, "ज्या ठिकाणी ठाकरे गटातील खासदार आहेत, त्या जागा.."

कामाचा सपाटा

शिंदे-फडणवीस यांनी शपथ घेतल्याच्या दिवशीपासूनच कामाचा सपाटा लावला आहे. मंगळवारी या सरकारला अकरा महिने पूर्ण झाले. सरकारमधील मंत्री केवळ गणेशोत्सव, दहीहंडी, नवरात्र यांच्यासारख्या कार्यक्रमांनाच फक्त हजेरी लावतात, अशी टीका विरोधकांकडून करण्यात येत असली तरी शिंदे-फडणवीस या जोडगोळीनं वेगवान निर्णय घेऊन आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयापेक्षा अधिक वेगवान शिंदे-फडणवीस सरकार असल्याचा दावा केला आहे.

शिंदे गटाची कामगिरी भाजपपेक्षा सरस

एका मीडिया रिपोर्टनुसार, आघाडी सरकारच्या पहिल्या ११ महिन्यांत २९ नोव्हेंबर २०१९ ते २९ ऑक्टोबर २०२० या काळात ६५३९ तर ११ महिन्यांत शिंदे सरकारचे १४,०७८ जीआर (सरकारी अध्यादेश) निघाले. मविआच्या तुलनेत शिंदे सरकार २.१ पट अधिक किंवा ११५.२९ % अधिक वेग आहे. शिंदे गटाची कामगिरी भाजपपेक्षा सरस तर आहेच, शिवाय उद्धव सरकारच्या तुलनेत दुप्पट वेगाने हे काम झाले, असे पाहणीत आढळले आहे.

 Eknath Shinde| Devendra Fadanvis
Sharad Pawar : शिंदेंच्या जमालगोटा वक्तव्यावर पवारांचा 'तडका' ; 'त्यांची भाषा त्यांनाच शोभते..'

शॅडो मुख्यमंत्री’ असल्याची टीका ?

शिंदे भाजपच्या इशाऱ्यावर काम करणारे “शॅडो मुख्यमंत्री’ असल्याची टीका विरोधक करीत असताना सरकार स्थापन झाल्यापासून ३० जून २०२२ ते २९ मे २०२३ दरम्यानच शिंदे गटाची कामगिरी भाजपपेक्षा सरस असल्याचे दिसते. निर्णयाच्या अंमलबजावणीत शिंदे गट आघाडीवर आहे.

  • ११ महिन्यांतील निर्णयात भाजपशी संबंधित खात्यांचे ५९.७५% निर्णय आहेत, त्यांच्या अंमलबजावणीसाठी आलेले ६१.७०% जीआर शिंदे गटाशी संबंधित

  • ११ महिन्यांत १४,०७८ जीआर निघाले. यात भाजपच्या खात्याचे ५३९१ (३८.२९%) तर शिंदे गटाच्या खात्याचे ८६८७ (६१.७०%) जीआर आहेत.

  • शिंदे गटाच्या एकट्या पाणीपुरवठा विभागाचे ३३५२ जीआर जलजीवन मिशनच्या गावांत नळ व पाणीपुरवठा योजनेस मान्यता देण्याचे आहेत.

  • ११ महिन्यांत भाजपच्या खात्याचे ५३९१ (३८.२९%) तर शिंदे गटाच्या खात्याचे ८६८७ (६१.७०%) जीआर आहेत.

  • शिंदे गटाच्या पाणीपुरवठा विभागाचे ३३५२ जीआर जलजीवन मिशनच्या गावांत नळ व पाणीपुरवठा योजनेस मान्यता देण्याबाबतचे आहेत.

  • ११ महिन्यांत मंत्रिमंडळाच्या ३६ बैठकांत २४६ निर्णय झाले. यात भाजपकडील १४७ (५९.७५%) व शिंदे गटाच्या खात्याचे ९९ (४०.२%) निर्णय आहेत.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com