Rohit Pawar : जयंत पाटलांना बाजूला केलं, आता सुप्रिया ताईंशी तरी 'पंगा' घेऊ नका : ज्येष्ठ नेत्याचा रोहित पवारांना 'सबुरीचा' सल्ला

Rohit Pawar Vs Hasan Mushrif : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचे रमी खेळतानाचे वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस रोहित चांगलेच चर्चेत आले आहेत.
Rohit Pawar
Rohit PawarSarkarnama
Published on
Updated on

Rohit Pawar Vs Hasan Mushrif : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचे रमी खेळतानाचे वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस रोहित चांगलेच चर्चेत आले आहेत. अशात आता रोहित पवार यांना आता घाई झालेली आहे. त्यांना अजित पवार यांची जागा घ्यायची आहे. जयंत पाटील यांचाही दबावाने राजीनामा घेतला. आता किमान सुप्रिया सुळे यांच्याशी तरी त्यांनी मतभेद करू नयेत एवढीच माझी इच्छा आहे, असा खोचक टोला वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी रोहित पवार यांना लगावला. ते कोल्हापूरमध्ये बोलत होते.

कृषी मंत्री माणिकराव कोकाटे मोबाईलमध्ये पत्त्यांची गेम खेळत असल्याचा व्हिडिओ रोहित पवार यांनी रविवारी ट्विट केला. हा व्हिडीओ महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. कोकाटे यांच्यावर बरीच टीकाही झाली. यावर बोलताना मुश्रीफ म्हणाले, मला वाटलं क्लबमध्ये जाऊन पैशांच्या बंडलासह खेळ खेळतानाचा व्हिडिओ आहे. मात्र माणिकराव कोकाटे मनाने प्रेमळ आणि स्पष्टवक्ता माणूस आहे, अशी पुष्टी जोडली.

रोहित पवारांचं कसं झालंय माहितीय का, त्यांना आता घाई झालीय, त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांची जागा घ्यायची आहे. प्रसार माध्यमांमध्ये जयंत पाटलांचा राजीनामाही दबावाने घेतला असं वाचलं, आता पक्षही रोहित पवारांच्या हातामध्ये दिल्याचं दिसतंय, हा त्यांचा पक्षाचा प्रश्न आहे. पण रोहित पवारांनी आत्या सुप्रिया सुळे यांच्याशी तरी किमान मतभेद करू नये एवढीच अपेक्षा आहे, असा टोला मुश्रीफ यांनी लगावला.

Rohit Pawar
Rohit Pawar: बीडनंतर आता सांगलीत नवा आका तयार होतोय! त्याला वेळीच आवरा! रोहित पवार सरकारवर भडकले

लातूरमध्ये छावा संघटना आणि राष्ट्रवादी पक्षामध्ये झालेल्या राड्यावर मुश्रीफ म्हणाले, मीही तो प्रकार पाहिला. आमचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे तिथे होते, त्यांनीही यावर प्रतिक्रिया देताना या गोष्टीचं समर्थन केलेलं नाही. सुरज चव्हाणने पत्ते फेकल्याबद्दल पोलिसांकडे तक्रार करायला हवी होती. अशा गोष्टी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी टाळायला हव्या, असं गुद्यावर येऊन चालणार नाही. छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणे हे योग्य नाही. शेतकरी हा बळीराजा आहे, ही राष्ट्रवादीची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com