Rohit Pawar News : 'हा' तर संगतीचा परिणाम; रोहित पवारांचा मंत्री अनिल पाटलांवर निशाणा

Anil Patil And Students : विद्यार्थ्यांना स्वागतासाठी ताटकळत ठेवल्यामुळे अनिल पाटलांवर टीका
Anil Patil, Rohit Pawar
Anil Patil, Rohit PawarSarkarnama
Published on
Updated on

राजेंद्र त्रिमुखे

Rohit Pawar On Anil Patil : राष्ट्रवादी काँग्रेसमधे उभी फूट पडली. यावेळी अजित पवार यांच्यासह नऊ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमधे मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर इतर आठ आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यात जळगाव जिल्ह्यातील अंमळनेरचे आमदार अनिल पाटील यांनी शपथ घेतल्यानंतर शुक्रवारी (ता. ७) आपल्या अंमळनेर मतदारसंघाला भेट दिली. (Latest Political News)

मंत्री अनिल पाटील हे मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच अंमळनेरला येत असल्याने त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. मात्र यात रस्त्याच्या दुतर्फा आश्रमशाळेतील शालेय विद्यार्थ्यांना उभे करण्यात आले होते. मंत्री पोहचेपर्यंत बराच वेळ विद्यार्थी ताटकळत उभे रहावे लागले. उभे राहिल्याने अनेक मुले कंटाळली. त्यामुळे ते बसलेले व्हिडीओत दिसत आहेत. यावर आमदार रोहित पवार यांनी मंत्री अनिल पाटलांच्या स्वागतावेळी झालेल्या या प्रकाराचा चांगलाच समाचार घेतला आहे.

Anil Patil, Rohit Pawar
Satara NCP News : शरद पवारांची साथ सोडून मकरंद पाटील अजितदादा गटात...

याबाबत सोशल मीडियातून व्यक्त होत आमदार रोहित पवार यांनी मंत्री पाटलांवर निशाणा साधला आहे. पवार म्हणाले, "स्वागत करून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना अभ्यास सोडून रस्त्यावर ताटकळत ठेवणे हे कॅबिनेट मंत्र्याला शोभत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसची तर ही विचारधारा असूच शकत नाही."

शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री शिवसेना आणि भाजपच्या संपर्कात आले. हा धागा पकडू पवार यांनी पाटील यांच्यावर संगतीचा परिणाम झाल्याचा खोचक टोलाही लगावला आहे. रोहित पवार म्हणाले, "संगतीचा परिणाम अवघ्या चार दिवसातच होत असेल तर हे जरा आश्चर्यकारकच आहे."

Anil Patil, Rohit Pawar
Ajit Pawar News : उपमुख्यमंत्री पवारांची तत्परता अन् वाचले सात जणांचे प्राण; नेमकं काय घडलं ?

रोहित पवार यांनी या घटनेबाबतचा स्वागतवेळचा एक चित्रफित जोडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधे उभी फूट पडल्यानंतर मोठ्या संख्येने आमदार अजित पवार यांच्यासोबत गेल्याचा दावा केला जात आहे. रोहित पवार हे शरद पवार यांच्यासोबत सुरुवातीपासून सावली सारखे दिसत आहेत. गेल्या दोन दिवसांत त्यांनी शरद पवारांना सोडून गेलेल्या काही ज्येष्ठ नेत्यांना आतापर्यंत मिळालेल्या मंत्रिपदांचा हवाला देत प्रश्न उपस्थित केले आहेत.

कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागलेले अनिल पाटील यांच्या स्वागताला विद्यार्थ्यांना ताटकळत उपस्थित ठेवल्याबद्दल महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जाब विचारत टीका केली जात आहे. तर समाजमाध्यमात पण नेटकऱ्यांनाही त्यांना धारेवर धरले आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री अनिल पाटील यांनी आपण असे कोणतेही आदेश दिलेले नव्हते असे स्पष्टीकरण माध्यमातून दिले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com